जगातलं एकमेव असे मंदिर जिथे महादेवांची सहा वेळा पूजा होते

Spread the love
उज्जैन महाकाल मंदिर जगातलं एकमेव असे मंदिर जिथे महादेवाची सहा वेळा पूजा होते. आणि प्रत्येक आरतीमध्ये देवाचे नवीन स्वरूपात दर्शन होते.सगळ्यात पहिले सकाळी चार वाजता महाकालची भस्म आरती जिथे महादेवाचे भस्म स्वरूप दर्शन होते.दुसऱ्या आरतीमध्ये महाकाल देवाचे घटा टोप स्वरूपात दर्शन होते.तिसऱ्या आरती मध्ये महादेवाचे स्वतःचे अवतार हनुमानाची पूजा केली जाते.चौथ्या आरती मध्ये महादेवाचे शेषनाग स्वरूपात दर्शन होते.पाचव्या आरती मध्ये महादेव लग्न मंडपातल्या वर देवाचे स्वरूप धारण करतात जे अतिशय सुंदर आहे. आणि सहावी आरती ही शयन आरती होते. ज्यामध्ये महादेव स्वतःच्या स्वरूपामध्ये दिसतात या महाकाल देवाच्या स्वरूपाचे काही भाग्यशाली लोकच फक्त दर्शन करू शकतात कारण हे स्वरूप महादेव फक्त वर्षातून एकदाच धारण करतात.जसं महाकालीचा अवतार,लाडका बाप्पा गणपतीचा अवतार आणि रुद्र अवतार या स्वरूपाचे दर्शन फक्त भाग्यशाली लोकच करू शकतात.तुम्ही जर एकदा या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन नक्की या जय महाकाल…
error: Content is protected !!