Spread the love

हेरवाड / प्रतिनिधी

हेरवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी मिनी ट्रॅव्हलर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.यातील मयत व जखमी इसम अब्दुललाट येथील असल्याचे समजते. आकाश लोहार असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून गेलेली अधिक माहिती अशी की, मोटरसायकल चालक आकाश लोहार व त्याचा मित्र मजरेवाडी मार्गावरून अब्दुलाटच्या दिशेने जात असताना बोरगावहून कुरुंदवाडच्या दिशेने विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या मिनिट ट्रॅव्हलर मध्ये अपघात घडला. मोटरसायकल चालक मिनी ट्रॅव्हलरच्या मागच्या चाकात घुसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली, तर मागे बसलेला इसम बाजूला जाऊन पडला. या अपघातात मोटरसायकल चालक आकाश लोहार जागीच ठार झाल्याचे समजते तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेची माहिती मिळतात कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

error: Content is protected !!