Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती तसे गुन्हेही पोलीस स्टेशनला दाखल झाले आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील,उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर डीबी पथकाने अशा वाहन चोरी करणाऱ्या व विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. यामध्ये सागर आप्पासो चव्हाण राहणार गोसावी गल्ली,अवधूत परीट राहणार केटक्याळे गल्ली,स्वप्निल मुदगल राहणार गोसावी गल्ली यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी ५ मोटरसायकली यामध्ये स्प्लेंडर सीडी डॉन एक्टिवा अशा ५ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे या गाड्या चोरून त्यातील मिस्त्री सागर चव्हाण याचे इंदिरा गांधी रुग्णालयाजवळ आहे.या ठिकाणी या गाड्या आणून गाड्यांची तोडफोड करून याचे वेळोवेळी सुट्टे स्पेअर पार्ट विक्री करत होता.याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे पोलिसांना माहिती मिळाली होती.पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून या मिस्त्रीकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी या चोरीच्या गाड्या असल्याची कबूल दिली.चोरी प्रकरणी सागर चव्हाण,अवधूत परीट,स्वप्निल मुदगल यांना ताब्यात घेऊन आज गुरूवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद वायदंडे, रावसाहेब केसरकर,सुनील बाईत, गजानन बरगाले,सतीश कुंभार, पवन गुरव,विजय माळवदे, अविनाश भोसले अरविंद माने यांचा पथकाने केली.

error: Content is protected !!