शिरोळ / प्रतिनिधी
ऐतिहासिक शिरोळ नगरीतील छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या कल्लेश्वर तलावाच्या काठाला “माता रमाबाई आंबेडकर” वसाहत आपल्याला पाहायला मिळेल आणि याच वसाहती मधील एक तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व म्हणजेच …..
🔵सन्माननीय श्रीयुत सुरज कांबळे 🔵
यांचा जन्म मुळातच आर्थिक दृष्ट्या अतिशय गरीब कुटुंबात झाला. अवघ्या वयाच्या सातव्या वर्षीच वडिलांच छत्र हरपले.कुटुंबात आई आणि भाऊ,बहीण कुटुंबाची जबाबदारी आईवर येऊन पडली.आणि या परिस्थितीचे जाण आणि भान अगदी लहानपणापासूनच डोक्यात ठेवून संघर्ष पाचवीला पुजलेला असा हा नित्यक्रम त्यामुळे मनाने एक ध्यास घेऊन “आयुष्यात एक चांगला माणूस बनायचं” असा त्यानी एक संकल्पच केला.आपले बंधुराज सुशांत आणि आई यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने पदवीपर्यंत शिक्षण घेऊन डीएड केले.परंतु सद्यस्थितीला नोकरी म्हणजे लॉटरी लागल्यागत प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आले.मुळातच छत्रपती राजश्री शाहू महात्मा ज्योतिबा फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे अफाट वाचन आणि याचमुळे यांच्या विचाराचा पगडा त्यांच्या प्रगल्भ बुद्धीवर पडला आणि याच विचारानेआणि मन,मनगट आणि मस्तक तंदुरुस्त बनवून घेतले.आणि मनाशी एक ठाम निर्णय केला.आपण जसे आपल्या आयुष्यात भोगलो असे जीवन समाजातील कोणालाही वाट्याला येऊ नये यासाठी गरीबी काय असते ही जवळून पाहिल्याने त्यामुळे कसे हाल होतात हे माहीत असल्याने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू मनाशी धरून येथून पुढील आयुष्य समाजासाठी खर्ची करायचे हा एकच ध्यास घेऊन सुरज कामाला लागले.समाजातील दिनदलीत दुबळ्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या अशा रंजल्या गांजल्या लोकांना रात्री अपरात्री मदतीसाठी धावू लागले हे करीत असताना आपल्या प्रभागातील लोकांचा विश्वास संपादन केला.. आणि याची फलित म्हणूनच की काय येथील बंधू भगिनी माता यांनी सन्माननीय श्रीयुत कांबळे यांच्या वहिनीसाहेब सौभाग्यवती कुमुदिनी सुशांत कांबळे यांना शिरोळ नगरीमध्ये विक्रमी मतांनी निवडून येऊन नगरसेवक ते “उपनगराध्यक्ष” पद प्राप्त झाले.हे फक्त आणि फक्त सुरज यांनी केलेल्या कामाची पोहचपावतीच म्हणावी लागेल.इतक्या मोठ्या शिरोळ नगरी सारख्या शहराचे “उपनगराध्यक्ष “पद नगरसेवक पद मिळाल्याने याचा पुरेपूर फायदा वैयक्तिक न घेता सर्व श्रेय हे आपल्या समाज बांधव आणि प्रभागातील जनतेला कायम गृहीत धरून त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या प्रभागामध्ये अंडरग्राउंड गटार रस्ते काँक्रिटीकरण,डांबरीकरण तसेच हाय मॅक्स पथदिवे आणि विशेष म्हणजे बरेच दिवस ज्याची गरज होती ती म्हणजे पाण्याची पाईपलाईन अशी अनेक कामे सुरज कांबळे यांनी त्यांचे नेते आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ती नेहमीच पाहतात असे शिरोळ नगरीचे प्रथम लोकनेते नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील (भैय्या )यांच्यावर अफाट श्रद्धा आणि प्रेम अर्पण करून वरील कामांचा पाठपुरावा करून आपल्या प्रभागाचा मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणलेलेच आहे.”शिक्षण म्हणजेच वाघिणीचं दूध आहे.” आणि हे ब्रीदवाक्य डोक्यात ठेवून समाजातील शिक्षणापासून उपेक्षित असणाऱ्या अनेक कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि हे करत असतानाच प्रभागातील विद्यार्थ्यांना दहावी बारावी पदवीधर अशा परीक्षेसाठी विचारवंतांना बोलावून मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले. आणि याच परीक्षेमध्ये उत्तीर्ण किंवा प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मोठ्या प्रमाणात करणे आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रयत्न करावा यासाठी मार्गदर्शनपर प्रबोधन पर असे कार्यक्रम नेहमीच सुरज कांबळे साहेब घडवून आणतात.शिक्षण घेतल्यानंतर नोकरी साठी कसा प्रयत्न करावा याचीही मार्गदर्शन करण्यासाठी सुरज कांबळे नेहमीच प्रयत्न करीत असतात.आपल्या प्रभागामध्ये महापुरुषांच्या नावाने अनेक नगर अस्तित्वात आहेत आणि या महापुरुषांच्या एकेरी नावाने पूर्वी यांचा उल्लेख केला जायचा म्हणून आदर युक्त असे त्यांचे नामकरण करण्यासाठी सन्माननीय सुरज कांबळे यांनी नगरपालिकेत तसा ठराव मांडून या नगरांना छत्रपती शिवाजी महाराज नगर छत्रपती संभाजी महाराज नगर,माता रमाबाई आंबेडकर नगर,माता सावित्रीबाई फुले नगर असे सुधारित नामकरण केले.आणि याचबरोबर सुरज कांबळे यांनी अनेक संकल्प केला तो म्हणजे आपल्या प्रभागातील कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल त्या दिवशी त्यांच्या शुभ हस्ते शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या या महापुरुषांचे अर्ध पूर्णाकृती पुतळ्यांना जलाभिषेक खालून पुष्पहार अर्पण करण्याचा नित्य नियम चालू ठेवला तो आजतागायत अखंडपणे अविरतपणे सुरू आहे.”सुरज “हे नावाप्रमाणेच लोकांना प्रकाश देणारा सूर्य…अशीच यांचीही ख्याती आहे.सदैव जनसामान्यांच्या हृदयात यांच्या बद्दल एक आपुलकीची भावना जणू काही आपल्या कुटुंबातलाच माणूस अशा प्रकारे त्यांच्यावर अफाट प्रेम करणारी त्यांचे समाज बांधव आणि मित्रपरिवार पाहायला मिळतो आणि याचमुळे त्यांना काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते असे त्यांचे स्पष्ट मत आहे.आणि या ऊर्जेच्या जोरावरच त्यांनी समाजामध्ये कोणतेही आपत्ती नैसर्गिक संकट मग तो कोरोनाचा महाभयंकर असा काळ असो किंवा महापूर असो अशीकोणतीही अडचण संकट असू दे यामधून सर्वसामान्य माणसाला कसे बाहेर काढायचे हे अगदी पोट तिडकेने ते करण्याचा प्रयत्न करीत असतात.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या प्रभागातील दिव्यांग, अंध,अपंग अशा व्यक्तींची साठी प्रभागांमध्ये कायम शिबिर भरवले जातात आणि अशा शिबिरामध्ये बऱ्याच लोकांनी लाभ घेतलेला आहे.बऱ्याच लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन असो..कृत्रिम पाय हात वगैरे बसवण्याचे असेल तर स्वतः सूरज कांबळे साहेब जयपूर येथे जाऊन स्वखर्चाने त्या माणसाला जीवन चालण्यासाठी सदैव धडपडत असतात मदत करत असतात.राजकारणात आणि समाजकारणात तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. तरच आपल्या या भागाचा विकास होईल.यासाठी आपले राजकीय नेते म्हणून शिरोळ नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय श्रीयुत अमरसिंह माने पाटील (भैय्या) यांच्यावर अफाट श्रद्धा आणि निष्ठा असल्यामुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या प्रभागांमध्ये सुरज कांबळे हे नेहमीच अनेक विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात माहीर आहेत.यामध्ये जेणेकरून समाजाचा काहीतरी फायदा व्हावा हा दृष्टिकोन ठेवून आरोग्य शिबिर,आधार कार्ड नवीन काढणे दुरुस्ती करणे, मतदान नोंदणी करणे, आयुष्यमान भारत कार्ड काढणे,पी एम किसान पेन्शन योजना,संजय गांधी निराधार पेन्शन योजना,महिलांच्यासाठी स्वयंरोजगार लघुउद्योग करता यावा यासाठी कापडी पिशवी निर्माण करणे,शिलाई प्रशिक्षण,फॅशन डिझाईन असे अनेक प्रकारचे शासकीय उपक्रम नेहमीच मोफत राबवत असतात.सुरज म्हणजे… एक कुशल संघटक सदैव भवताली मित्र परिवाराचा गराडा आणि तोंडात कायम सौजन्य पूर्ण असे बोलणे पुढच्या माणसाला आदरयुक्त बोलून आपलेसे करणे हा त्यांचा स्वभाव गुण म्हणावा लागेल.आणि त्यांच्या या व्यक्तिमत्त्वावरच ते आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात स्वतः आपले वलय निर्माण करून आपल्या घराण्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्या स्वतःचे हिमतीवर आणि आपल्या स्वभावावर ही आपली जीवाला जीव देणारी माणसं त्यांनी सदैव सांभाळले आहेत.आणि सुरज सुद्धा त्यांच्यासाठी सदैव आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा नेहमीच करीत असतात.
याचबरोबर सन्माननीय सुरज यांना कला क्रीडा सांस्कृतिक आणि व्यायाम या क्षेत्रात सुद्धा अधिक आवड आहे.प्रभागातील मुला मुलींना मैदानांची सोय करून देणे.वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील स्पर्धा आयोजित करणे आणि यामधूनच आपल्या प्रभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नेहमीच करीत असतात याचबरोबर आपल्या समाजासाठी सुद्धा नेहमीच अग्रेसर असतात.यामध्ये अनेक महापुरुषांचे विचार आणि यांच्या विचारावर पगडा ठेवून आपल्या समाजाचे समाजकारण व्हावे यासाठी थोर आणि जेष्ठ विचारवंतांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आपल्या समाजामध्ये ते नेहमीच आयोजन करतात.घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो महात्मा फुले जयंती असो,महात्मा सावित्रीबाई फुले यांची जयंती असो,किंवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो अशा या महापुरुषांच्या जयंतीसाठी सुरज कांबळे अगदी हिरीरीने भाग घेऊन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी कशी होईल याकडे लक्ष दिले जाते.
असा हा सीधा,साधा,सरळ स्वभावाचा मितभाषी असणारा,सर्वसामान्यांची बांधिलकी जोपासणारा सदैव त्यांच्याशी नाळ जोडून असणारा एका हाकेत कोणताही विचार न करता मदतीला धावणारा असा राजा माणूस सुरज कांबळे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्माननीय सुरज आपल्या या नावाप्रमाणेच आपल्या कार्य कुशल स्वकर्तुत्वाने राजकारण आणि समाजकारणात एक नवीन तरुण तडफदार चेहरा या भागातील अशा स्थान म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते.आणि म्हणूनच ते सदैव सामाजिक क्षेत्रात सूर्यासारखे सदैव तळपत लोकांना लखलख प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात.अशा या युवा नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या प्रत्येक कार्यात यश सुख शांती समाधान धनधान्य ऐश्वर्य लाभो…!
त्यांना व त्यांच्या परिवाराला चांगले आरोग्य लाभो..!
तसेच भावी पुढील राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांना असेच उत्तरोत्तर यश लाभावे..!
यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा…!
शब्दांकन
सचिन पवार शिरोळ