भाजप कार्यकर्त्यांचा साखर पेढे व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

 इचलकरंजी शहरामध्ये भाजपच्या व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी कार्यालय शिवतीर्थ चौक महात्मा गांधी चौकामध्ये साखर पेढे व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची एक हाती सत्ता आली आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती.आज मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज आझाद मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शपथ घेतली.या शपथ विधीला देशातील व 14 राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित झाले होते.तसेच राजकीय पक्षाचे विरोधी पक्ष नेते उपस्थित होते.यावेळी या तिघांना शपथ देण्यात आली.आज इचलकरंजी शहरामध्ये भाजपच्या व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची याची शपथ घेतली आहे.तसेच अजित पवार यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे.तसेच पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेतली आहे.तर उर्वरित मंत्र्यांची शपथविधी लवकरच होणार आहे.तसेच मंत्रिमंडळ विस्तार होणार महायुतीला भक्कमपणे राज्यातील जनतेने कौल दिला आहे.त्यामुळे पुढची पाच वर्ष महाराष्ट्र राज्याचा विकास होणार अशी आत्मविश्वास माहितीच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांनी बजावला आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महायुतीच्या महिला पदाधिकारी यांनी महात्मा गांधी चौकात dj तालावर ठेका धरला होता तसेच फुगडी हि घालण्यात आली.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष पै. अमृत मामा भोसले, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई कुबडगे,युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अशोक स्वामी,आशिष खंडेलवाल,रवींद्र घोरपडे,शेखर शहा,अनिस म्हालदार, राजेश राजपुते यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!