मेडिसिन घेवून जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने समोरील ट्रक व कारला धडक बसून ट्रक ब्रिजवरून २० फूट पलटी वाहनांचे लाखोचे नुकसान
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथील मयुर फाट्यावर मेडिसिन घेवून जाणार्या ट्रकचा टायर फुटल्याने समोरील ट्रक व कारला धडक बसून ट्रक ब्रिजवरून २० फूट सेवा रस्त्यावर पलटी झाला सुदैवाने कोणतीच जिवीत हानी झाली नाही या अपघातात तीन वाहनांचे लाखोचे नुकसान झाले आहे.शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मयुर फाट्यावर आज गुरूवार सकाळी ११ वाजण्यासुमार भरधाव वेगाने चेन्नईकडे निघालेल्या ट्रक क्रमांक टी एन ८८ ए ३४७९ या ट्रकचा उजव्या बाजूचा समोरील टायर फूटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून समोरील ट्रकच्या डाव्या मागिल बाजूस धडक देवून ट्रक ब्रिजवरून २० फूट सेवा रस्त्यावर खाली पलटी झाला नशीब बलवत्तर म्हणून ट्रक चालकाचा जिव वाचला त्याच बरोबर सेवा रस्त्यावर रहदारी नसल्याने मोटा अनर्थ टळला . मुंबई येथे मेडिसिन भरून वेळेवर चेन्नई येथे पोचवण्यासाठी ट्रक चालकाने ट्रक थांबवून आराम न करता मुंबई ते चेन्नई प्रवास सुरू केला पण प्रवास जास्त वेळ सुरू राहिल्याने ट्रकचा टायर गरम होवून मयुर फाटा येथे आल्यावर टायर फुटल्यावर हा अपघात झाला यामध्ये कार क्रमांक एम एच १४ डी ए ९७२० व ट्रक क्रमांक के ए २२ ए ए २३१८ असे तीन वाहनांचे लाखोचे नुकसान झाले आहे .