चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर व ट्रॉली नदीपात्रात कोसळली

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

येथील अनवडी पुलाच्या उताराला उसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली चालकाचा ताबा सुटल्याने थेट पात्रात कोसळली चालकाने प्रसंगावधान राखून उडी घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.ट्रॅक्टर पाण्याच्या गाळात बुडाला असून त्यावर ट्रॉली कोसळल्याने ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला आहे.बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.अंदाजे ट्रॅक्टरचे 4 लाखाचे नुकसान झाले आहे.दरम्यान याठिकाणी नेहमी अपघात होतात.पुलाचा उतार उतरताना आणि उंचावर ट्रॅक्टर नेताना चालक आपला जीव मुठीत धरून याठिकाणी प्रवास करत असतात याठिकाणी उंचीचा पूल उभारन्याची गरज आहे.येथील भैरववाडी दरम्यानच्या शिरोळ बंधाऱ्याकडून  ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्यासह ट्रॅक्टर क्र(एम.एच 09 ए.एन 1965)हा कुरुंदवाडच्या दिशेने जात असताना उताराला ट्रॅक्टरचा चालक सोमेश मळवाडे (रा.गणेशवाडी, ता.शिरोळ) याचा ताबा सुटल्याने अनवडी पुलाच्या पात्रात ट्रॅक्टर कोसळला चालक मळवाडे याने उडी घेतल्याने तो सुखरूप बचावला.या रस्त्यावर शेतकऱ्यांची नेहमी ये-जा असते त्यावेळी या पुलावर कोणीच नसल्याने अनर्थ टळला आहे.हा अपघात झाल्याचे समजताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.गणेश मेस्त्री यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोणाला दुखापत झाली आहे का?याची माहिती घेऊन ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी मदत केली.प्रत्येकवर्षी चालक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करत असतात याबाबत गांभीर्य घेऊन पर्यायी पूल तयार करावा अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!