शिरोळ / प्रतिनिधी
मागील 200 रुपये व चालू गळीत हंगामासाठी 3700 रुपये या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटना यांनी शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन गेली चार दिवस सुरू होते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसील कार्यालयात आज गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता आंदोलन अंकुश संघटना व साखर कारखादार यांची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीस सकारात्मक चर्चा झाली आंदोलन अंकुश संघटनेच्या काही मागण्या साखर कारखान व्यवस्थापनाने मान्य करत बैठक यशस्वी पार पाडली.
यावेळी आंदोलन अंकुश अध्यक्ष धनाजी चुडमुंगे म्हणाले शिरोळ तालुक्यातील ऊस जानेवारी अखेर तोडण्यास सर्व साखर कारखाण्यांची तयारी दर्शविली आहे तसेच ऊस तोड मजूर वाहतूकदार यांनी पैसे मागितल्यास कारवाई करण्याच्या नोटीस लागू करणार,शेतकऱ्याने खुद तोड खुद वाहतूक केल्यास टणाला 4100 रुपये दिले जाणार,क्रमपाळीनुसार ऊस तोड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय,क्रमपाळी ग्रामपंचायत व चावडी कार्यालयात 12 तारखेच्या आत प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाला आहे तर आमची प्रमुख मागणी असलेली मागील 200 आणि चालूला 3700 चा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत होणार असल्याने त्यामुळं शिरोळ मधील आंदोलन जिल्हाधिकारी यांच्या बैठकीपर्यंत स्थगित केले तर 9 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला.या बैठकीस श्री दत्त शिरोळ,गुरुदत्त टाकळीवाडी, जवाहर हुपरी आणि पंचगंगा इचलकरंजी या साखर कारखाण्याचे प्रमुख अधिकारी व आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.