टाकवडे येथे ऊस जळण्याचे सत्र सुरूच,दहा एकर ऊस जळून खाक

Spread the love

टाकवडे / प्रतिनिधी

टाकवडे ता.शिरोळ येथे ऊस जळण्याचे सत्र सुरूच आहे.बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुन्हा जनवाडे पाणंद रस्त्यावरील पेंढारकी भागात दहा एकर ऊस जळून खाक झाला आहे.कुणीतरी जाणून बुजून आग लावण्याचे काम करत असल्याचे शेतकऱ्यांना संशय आहे.आठ दिवसात जवळपास ८० एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.बुधवारी सतिश शेवाळे, मनोज शेवाळे,शरद शेवाळे,शितल शेवाळे, बाळासो निर्मळ फलटणे या शेतकऱ्यांच्या उसाला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.नेमके आगीचे कारण समजू शकले नाही.टाकवडे परिसरात वारंवार ऊस जळीताचे प्रकार घडत आहेत.कोणतरी आग जाणून बुजून लावत आहेत असा संशय व्यक्त होत आहे.ऊस हंगाम सुरू झाला असून या तोंडावरच ऊस जळण्याचा प्रकार का घडत आहे.हा संशोधनाचा विषय बनला आहे.ऊस जळण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

error: Content is protected !!