अब्दुल लाट / प्रतिनिधी
एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप २०२४ व एमआरएफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ या टू व्हिलर बाइक स्पर्धेत जिनेंद्र सांगावे हा फॉरेन बाइक ग्रुप ए २५० सीसी विभागात देशात प्रथम क्रमांक मिळवत डबल चॅम्पियनशिप झाला.अ.लाट (ता.शिरोळ) येथील सोळा वर्षीय जिनेंद्रने पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड करत या स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. एमआरएफ टायरच्यावतीने नॅशनल चॅम्पियनशिप टाइटलसाठीच्या स्पर्धा श्याम कोठारी व गॉडस्पीड टीम पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जिनेंद्र सांगावे याने फॉरेन बाईक ग्रुप ए २५० सीसी विभागात ज्युनिअर गटात भाग घेतला होता. या दोन्ही चॅम्पियनशिप स्पर्धासाठी एकूण १० स्पर्धा आयोजित केल्या होत्या.या स्पर्धा कोइमतूर,नाशिक, कोल्हापूर,बडोदा,जयपूर, नागपूर,भोपाळ,बंगलोर आणि कोचिन ह्या १० मोठ्या शहरामध्ये झाल्या.सर्वप्रथम एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप मध्ये कोल्हापूर बडोदा,जयपूर आणि नागपूर या ठिकाणी पार पडल्या.या चारही स्पर्धेत जिनेंद्र प्रथम आला.नागपूर येथे झालेल्या स्पर्धेनंतर जिनेंद्र सांगावे डर्ट ट्रॅकचा नॅशनल चॅम्पियन घोषित झाला.एमआरएफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिपच्या ६ पैकी ६ रेस जिंकून कोचीन (केरळ) येथे अंतिम स्पर्धेत जिनेंद्र सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियन ठरला.जिनेंद्र हा अल्पभूधारक कुटुंबातून आणि एका छोट्या खेडे गावातून असून या कुटुंबाला मोटर स्पोट्र्सचा कोणताही अनुभव नसताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आजपर्यत १७५ हून अधिक वेगवेगळी पदकांची मिळकत करत ५ वेळा चॅम्पियन झाल्याचे जिनेंद्रचे मार्गदर्शक सागर सांगावे यांनी सांगितले.या स्पर्धा खेळण्यासाठी प्रायोजक म्हणून एक्सोर हेल्मेट कंपनी बेळगावी,जोल्ले ग्रुप एक्सम्बा, आमदार प्रकाश आवाडे क्रीडा प्रतिष्ठान,मोहिते रेसिंग अकडमी यांचे बहुमोल साथ मिळाली तर प्रीतम पाटील, कुंतीनाथ बरगाले,दिलावर बैरागदार,रियाज शेख यांचे सहकार्य आणि पिंकेश ठक्कर (पुणे),सोहम दळवी (पुणे),सचिन घोरपडे (कोल्हापूर), विराज कोथळे यांचे मार्गदर्शन लाभले.