कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
श्रीरंग मंगल कार्यालय पेठवडगाव येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) उपशाखा हातकणंगले यांच्या वतीने हातकणंगले विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉ.अशोकराव माने यांचा सत्कार समारंभ संपन्न.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.अनिल चव्हाण सर यांनी केले.यावेळी हातकणंगले तालुक्याचे शिक्षक नेते व शिक्षक बॅंकचे माजी चेअरमन श्री.राजमोहन पाटील यांनी शिक्षक संघाच्या कार्याचा आढावा घेतला. व शिक्षकांच्या प्रलंबित असणा-या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी मागणी केली.यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ.अशोकराव माने यांनी शिक्षकांच्या अविरत चालू असलेल्या ज्ञानदानाचे कौतुक केले. लवकरच प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे आश्वस्त केले.कार्यक्रमाचे आभार शिव शाहू शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री शिवराज सिद यांनी मांडले.या कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. पांडुरंग सिद, हातकणंगले भाजपा तालुकाध्यक्ष श्री.अमरसिंह पाटील,पोलिस निरीक्षक श्री.अजय सिद शिक्षक नेते व शिक्षक बॅंकचे माजी चेअरमन श्री.राजमोहन पाटील शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री. अनिल चव्हाण , सर्व तालुका कार्यकारिणी , शिव शाहू शिक्षक पतसंस्थेचे सर्व संचालक व सल्लागार मंडळ . शिक्षक बंधू उपस्थित होते.