हेरवाड / प्रतिनिधी
हेरवाड येथून पाचवा मैल – बोरगाव मार्गावरून रासायनिक खते वाहतूक करणारी पिकअप गाडी उलटल्याची घटना आज सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता घडली आहे.समोरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला चुकवण्याच्या प्रयत्नात पिकअपचा चालक ताबा सूटल्याने गाडी रस्त्यावर उलटली.हा अपघात हेरवाड येथील आलासे मळा येथे घडला.गाडी उलटल्यामुळे चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमी चालक बोरगाव येथील असल्याचे समजते. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.सुदैवाने अपघात घडला त्यावेळी समोरून कोणतेही वाहन न आल्याने मोठा अनर्थ टळला असून या अपघात पिकअप गाडीचे मोठे नुकसान झाले आहे तर रासायनिक खतांची पोटी फाटून मोठे नुकसान टळले.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत केली सदर घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना दिली.