“अंबप हादरलं” तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

Spread the love

अंबप / प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील १९ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता उघडकीस आली आहे.यश किरण दाभाडे वय वर्ष १९ असे मृत तरुणाचे नाव असून घटनास्थळी पेठ वडगाव पोलीस दाखल झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील बौद्ध समाजाच्या पाण्याच्या टाकीजवळ यश किरण दाभाडे या तरुणाचा धारदार हत्यारांने खून करण्यात करण्यात आल्याने अंबप गावात खळबळ उडाली आहे.खुणाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवी पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची पाहणी करून पंचनामा सुरू आहे.अद्याप खुणाचे कारण स्पष्ट झाले नसले तरी जुन्या हाफ मर्डर गुन्ह्यातून हा खून झाला असावा अशी चर्चा अंबप शहरात सुरू आहे अधिक तपास पेठ वडगाव पोलीस करत आहेत.खुणाच्या बातमीमुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

error: Content is protected !!