स्वा.से.श्रीपाल आलासे(काका) अर्बन बँकेला बँक असोसिएशनचा “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार वितरण

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

येथील स्वातंत्र्य सेनानी कै.श्रीपाल आलासे (काका)कुरुंदवाड अर्बन बँकेला कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे सालाबाद प्रमाणे 250 ते 500 कोटी ठेवीच्या गटातील उत्कृष्ट बँकांना देण्यात येणारा “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.कोल्हापुर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन तर्फे हॉटेल सयाजी येथे आयोजित शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात आला. बँकेचे जेष्ठ संचालक अरुण आलासे चेअरमन प्रदीप पाटील व चेअरमन सुधाकर पाटीलसह संचालकांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.पुरस्कार स्वीकारल्यानंतर यावेळी पत्रकारांची बोलताना ज्येष्ठ संचालक आलासे म्हणाले बँकेने मार्च 2024 अखेर एकुण 218.03 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. ठेवी 352.48 कोटी इतक्या असून एन.पी.ए 0 टक्के राखण्यात यश आले आहे.बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,वसंतराव नाईक विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ योजनेअंतर्गत युवकांना कर्ज पुरवठा करून युवा उद्योजक घडवण्याचा प्रयत्न केला आहे.या योजनेचा लाभ सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत कोल्हापूर वाशी नाका,सांगली माधवनगर येथे नवीन शाखा लवकरच सुरू करत असल्याचे सांगितले.
यावेळी संचालक मोनाप्पा चौगुले,महादेव धनवडे, नंद‌कुमार पाटील,तात्यासाहेब नाईक,इकबाल पटवेगार, सुनिल पाटील,भगवान गायकवाड,महावीर थोटे,भरत चौगुले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!