कामासाठी जावून येतो असे सांगुन हसूर येथून तरुण बेपता

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

हसुर ( ता शिरोळ ) येथून अमर इराप्पा चौगुले (वय वर्षे ३९ ) हा तरुण बेपत्ता झाला असून पत्नी सुरेखा चौगुले यांनी याबाबत शिरोळ पोलिसात वर्दी दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की,बेपत्ता अमर चौगुले हा १ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गावातील मादनाईक दूध डेअरी येथे कामासाठी जावून येतो असे सांगुन घरातुन निघुन गेला आहे.अद्यापही तो घरी परत आलेला नाही. उंची ५ फुट ६ इंच, चेहरा गोल, नाक सरळ, रंगाने सावळा, अंगाने जाड, केस काळे,अंगात गुलाबी रंगाचा व त्यावर काळया रंगाच्या रेषांचा हाफ बाहयांचा शर्ट व पायात काळी फूल पॅन्ट असे त्याचे वर्णन असून तो मराठी व कन्नड भाषा बोलतो. सदर वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास शिरोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिरोळ पोलिसांनी केले आहे.

error: Content is protected !!