धारधार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून दानोळीत युवकाचा खून

Spread the love

दानोळी येथे धारधार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून खून झाल्याची घटना शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. संतोष शांतिनाथ नाईक (वय ३६) असे मृत युवकाचे नाव आहे.नाईक याचा खुनाने दानोळी गावात खळबळ उडाली आहे.अद्याप खुनाचे कारण समजू शकले नाही अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की दानोळी येथील गैबीसाहेब दर्गा मैदानात युवकाचा मृतदेह आढळून आला.याची माहिती पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांना मिळताच जयसिंगपूर पोलीस इचलकरंजी उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवी,पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.मध्यरात्री तीन वाजता जयसिंगपूर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.खून नेमका कोणी व का केला याचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.पण आर्थिक कारणातून खून झाला असावा अशी चर्चा दानोळी गावात सुरू आहे.आरोपीच्या तपासासाठी पथके रवाना झाली आहेत.अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!