शिरोळ / प्रतिनिधी
येथील ह भ प श्रीमती विजया तुकाराम सावंत यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या वृत्तपत्र विक्रेते धनंजय सावंत,शिरोळ पालिकेचे कर्मचारी सचिन सावंत,व दत्त साखर कारखान्याचे सुरक्षा रक्षक बंटी सावंत यांच्या मातोश्री होत.रक्षाविसर्जन सोमवार दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे.