सौ.जयश्री पाटील यांचे झी मराठी भिशी व धर्मरक्षक महावीर छ.संभाजी महाराज रिल्स स्पर्धेत उल्लेखनीय यश

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील सौ.जयश्री पाटील यांनी झी मराठी वाहिनी अंतर्गत जी मराठीवरील मालिकामधील अभिनेत्रींची वेशभूषा,तसेच उर्विता प्रोडक्शन निर्मित धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज रिल्स स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले.याबद्दल त्यांचे सर्वत्रच अभिनंदन होत आहे.
झी मराठी वाहिनी अंतर्गत कुरुंदवाड येथील गिरीश सिनेमा हॉलमध्ये झी मराठी भिशी मार्फत महिलांसाठी झी वाहिनीवरील मालिकामधील अभिनेत्रीच्या वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.सदर स्पर्धेचे आयोजन कुरुंदवाड युथ कल्चरल अँड स्पोर्टस ग्रुपोच्यावतीने करण्यात आले.सदर स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मौजे अगरच्या शिक्षिका व शाहू नगर वाचनालय शिरोळच्या संचालिका सौ जयश्री पाटील पारू या मालिकेतील अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची केलेल्या वेशभूषा अभिनयास तृतीय क्रमांक मिळाला.स्पर्धेचे पारितोषिक आप्पी आमची कलेक्टर भूमिका साकारण्याऱ्या अभिनेत्री शिवानी नाईक यांच्या हस्ते पैठणी व क्राउन प्रदान करून करण्यात आले.उर्विता प्रॉडक्शन निर्मित संदीप रघुनाथराव मोहिते पाटील प्रस्तुत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज रिल्स स्पर्धेत छत्रपती संभाजी महाराजांना माझा एक फोन कॉल (१ मिनिट) या विषया अंतर्गत खुल्या गटात चौथ्या क्रमांकाचे ५०००रू. पारितोषिक मिळाले.सौ जयश्री पाटील यांना विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.जगदीश पाटील,उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे, सचिव मेजर प्रा.के. एम.भोसले, मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक तसेच रवींद्र पाटील शाहू वाचनालयाचे सर्व संचालक राधा महिला फाऊंडेशनच्या सर्व सदस्या यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल सौ जयश्री पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!