शिरोळ / प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त आयोजित एकतारी भजनी स्पर्धेत कवठे एकंद येथील बंडोपंत एकतारी भजनी मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
येथील भाजी मंडई येथे एकतारी भजनी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत एकतारी भजनी मंडळ या स्पर्धेत सहभागी झाले होते.या स्पर्धेत प्रथम बंडोपंत एकतारी भजनी मंडळ (कवठे एकंद),द्वितीय ओम गणेश एकतारी भजनी मंडळ (आरळीहट्टी),तृतीय मोरेश्वर एकतारी भजनी मंडळ (खंडेराजुरी),चतुर्थ विश्वकर्मा एकतारी भजनी मंडळ (आलास),पाचवा दुर्वांकुर एकतारी भजनी मंडळ (मिरज) या विजयी भजनी मंडळाना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम कायम चषक बक्षीस देण्यात आले.दिलीप संकपाळ व भगवान आवळे यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.या स्पर्धेचा शुभारंभ दत्तात्रय काळे,हणमंत भाट, अशोक भाट,धनाजी पाटील-नरदेकर,तानाजी हेरवाडे, उत्तम देवमाने,दिलीप गंगधर,सुरेश माळी,सतीश आडगुळे, बाळासाहेब संकपाळ, महावीर शितोळे,सुनील हारगे, सिताराम संकपाळ,भगवान आवळे,वसंत चुडमुंगे, शिवाजीराव जाधव (कवी),दिलीप संकपाळ,विश्वास चुडमुंगे,दत्तात्रय गंगधर,पांडुरंग माने,प्रदीप उर्फ गुंडू पाटील, विठ्ठल भाट, बाबासाहेब भाट, राजाराम कदम, श्री. प्रकाश भाट, अमर माने (मामा), श्री. पांडुरंग कुरणे, बजरंग कुरणे, अशोक भाट दिनकर मोरे, दत्तात्रय भाट, मोहन पवार, शहाजी इंगवले, कृष्णा भाट, पांडुरंग लामतुरे, परशराम भट (बापू), सुभाष माने (MHK) सुभाष भागवत, तानाजी भाट, कृष्णा चव्हाण, बाळासो भाट, अनिल गणपती काळे, दत्तात्रय काळे, नामदेव काळे, केशव काळे, जालंदर काळे, शिवाजी काळे (आबाजी), संभाजी काळे, किसन काळे (अलीसाब), शशिकांत मरळे उत्तम गंगधर, मिरासो कुरणे, बाबुराव हेरवाडे संजय दाभाडे, माणिकराव जगदाळे, युवराज संकपाळ, बंडू संकपाळ,शिवाजी गंगधर, धनाजी पाटील पदमाळे, पंडित चुडमुंगे, सदानंद बारवाडकर, दत्ता डकरे, राजू गावडे (गलिम), प्रभाकर पाटील, प्रकाश महात्मे, सचिन कोळी, सुरेश आवळे, यांच्या उपस्थितीत एकतारी भजनी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे मार्गदर्शक युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे, यांच्यासह उत्सव व उरूस समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्सव आणि उरूस उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.