शिरोळ / प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त आयोजित केलेल्या सिनेअभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर व बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत शिरोळची माहेरवाशिण सौ प्राजक्ता विश्वजीत पाटील (राशिवडे) या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख रक्कम पैठणी व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसानिमित्त पहिल्यांदाच शिरोळ येथे न्यू .होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्वर्गीय श्रीमती अंजनादेवी दिनकरराव यादव व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ मीना अशोकराव यादव यांच्या स्मरणार्थ सौ ज्योत्स्ना पृथ्वीराजसिंह यादव व सौ जागृती राहुल यादव यांनी या कार्यक्रमासह सर्व बक्षीसे आणि पैठणी प्रायोजित केली होती.जयसिंगपूरच्या माजी नगरसेविका सौ सोनाली मगदूम,शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सौ कविता चौगुले,कुरुंदवाडच्या माजी नगराध्यक्षा सौ माधुरी सांवगावे, हेरवाडच्या माजी सरपंच सौ. चंद्रकला पाटील, सौ. ज्योत्स्ना यादव,सौ.जागृती यादव, सौ. उज्वला पाटील, गायत्री मुळीक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर आणि बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन करत सहभागी महिला स्पर्धकांना विविध खेळातून आपले कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त करून दिली. ग्रामीण भागात प्रथमच होत असलेल्या या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात अनेक महिला स्पर्धक उत्साहाने सहभागी झाल्या.स्पर्धेतील यशस्वी झालेल्या स्पर्धकांना पैठणी भेट देण्यात आली.सौ प्राजक्ता विश्वजीत पाटील या न्यू होम मिनिस्टर ठरल्या त्यांना पंचवीस हजार रुपये पैठणी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक सौ आरती प्रशांत जाधव यांना पधरा हजार रुपये, तृतीय क्रमांक सौ सरिता प्रशांत हेरवाडे यांना दहा हजार रुपये, आणि चौथा क्रमांक सौ गीता परशराम भाट यांना पाच हजार रुपये, पाचवा क्रमांक सौ स्वप्ना अक्षय माने यांना तीन हजार रुपये रोख रक्कम पैठणी सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच दहा उत्तेजनार्थ यश मिळवलेल्या महिला स्पर्धकांना पैठणी सन्मानचिन्ह भेट देण्यात आले.या समारंभास माजी नगरसेविका सौ.अनिता संकपाळ, सुनीता आरगे, विदुला यादव सौ वेदिका शं.मोरे,सौ. मनीषा संग्राम माने, इंद्रायणी अ. देसाई, उज्ज्वला ग. देसाई, अनघा उमेश गावडे, गीता अनिल काळे, सौ. सुवर्णा मोहन यादव, अरुणा जाधव (मोरे), भाग्यश्री भाट, सौ. ऐश्वर्या श्री. यादव, वर्षा मोरे, वंदना द. पाटील, मनीषा दी. भाट, सौ. रुपाली सं. भाट, सौ. पल्लवी चुडमुंगे, रेखा प्र. कोळी, मंगल चंद्रकांत भाट, नम्रता जगताप, श्वेता बा. माने, सौ. मनीषा माने, स्वप्नाली शु. माने, सौ. वैशाली वे. माने
सौ. अस्मिता रा. कोळी, सुप्रिया उ. भाट, सुनीता र. कदम, सौ. स्वरांगी ते. भाट, सौ. नलिनी काळे, आनंदी द. भाट, मयुरी काळे, कविता भाट, अश्विनी भाट, सौ. मेघा भाट, सुनीता र. भाट, रुपा सं. काळे, सौ. कविता म. बाबर, सौ. मयुरी तोरस्कर, अलका भागवत, वंदना मा. काळे, प्रभावती बाबर, सौ. अनुराधा प. कदम, कल्पना शि. कदम, सौ. राणी दत्तात्रय बाबर, सौ. निलम ध. गावडे, पुनम ता. भाट, सौ. वनिता कृ. चव्हाण, सविता ता. बाबर, सौ. रेखा सु. काळे, सौ. सुप्रिया बु. काळे, सौ. शारदा वि. काळे, सौ. स्नेहल ला. गावडे, अमृता देशमुख, पूजा देशमुख, शालन स. काळे, सौ. सुरेखा शि. काळे, सौ स्वाती अ. भाट, सौ. गीता पं. भाट, सौ. अंजली वि. भाट, सौ. सुनीता शे. भाट, सौ. मनीषा बं. कुरणे, सौ. सविता सु. भाट, सौ. सुरेखा लामतुरे, सौ. गौरी श्याम कोळी, कु. पूजा यादव, सौ. अक्षरा अ. भाट, सौ. प्रियांका शि. भाट, सौ. विद्या ग. भाट सौ. सुनीता आ. भाट, सौ. सविता कु. भाट, सौ. उर्मिला बा.माने, सौ. अश्विनी वि. काळे, मोनल वि. भाट, यांच्यासह सर्व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे मार्गदर्शक युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, राहुल यादव, अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे, अनिल काळे, मोहन यादव, अवधूत देसाई, दीपक भाट, लालासो गावडे, दत्तात्रय बाबर, चंद्रकांत भाट ,प्रशांत चुडमुंगे, प्रफुल कोळी, सुभाष भाट उत्तम भाट यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.