दानोळी / प्रतिनिधी
दानोळी ता.शिरोळ येथील युवकांनी नेते राजेंद्र पाटील यड्रावकर याच्या विजयानंतर दानोळी ते तुंग (जि. सांगली) पर्यंतचा 20 किलोमीटरचा पायी चालत जाऊन हनुमान दर्शनाचे साकडे पुर्ण केले.गावातील यड्रावकर गटाचे समर्थक सुरज पाराज व वैभव पाटील, सुरज कलकुटगी या कार्यकर्त्यानी आपले नेते माजी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी व्हावेत यासाठी पायी दिंडी करुन सांगली जिल्ह्यातील तुंग येथील हनुमानाचे दर्शन घेणार असल्याचे साकडे घातले होते.यासाठी शनिवार दि. 30 रोजी पहाटे 5 वाजता पायी चालत साकडे पुर्ण केले.सुरज पाराज व वैभव पाटील सुदर्शन कलकुटगी यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.अगदी कमी वयापासून त्यांनी यड्रावकर याच्याशी जवळकी केली आहे.आपला नेता पुन्हा आमदार व्हावा यासाठी तुंग येथील हनुमानास साकडे घातले होते.पुन्हा एकदा यड्रावकरांची आमदारकीसाठी वर्णी लागल्याने व नेत्याला मंत्रिपद मिळावे यासाठी साकडे पूर्ण केले.नेत्यासाठी काय पण म्हणणारे कार्यकर्ते विविध उपक्रम राबवत आहेत.यावेळी ग्रामस्थामधुन मोठी चर्चा होत आहे.