वाढदिवस.. एका उत्साही सामाजिक कार्यकर्त्याचा….!!
चिरंजीव दिग्विजय संपतराव माने
अध्यक्ष शिरोळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस ..
संस्थापक “युवा पर्व फाउंडेशन..” यांचा…
सचिन पवार / विशेष
ऐतिहासिक शिरोळ नगरीतील एक माने परिवार म्हणजेच… एक सर्वसामान्य कुटुंब…पूर्वीच्या काळात घरगुती पद्धतीचे शाकाहारी मांसाहारीचे भोजनासाठी.. खवय्यांची अतिशय आवडीची अशी.. वैभव प्राप्त खानावळ.. “अन्नपूर्णा हॉटेल..” या व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा हा परिवार.. आणि याच परिवारातील.. श्री. संपतराव माने.. यांचे लाडके चिरंजीव..
सन्माननीय दिग्विजय संपतराव माने…
यांचा आज वाढदिवस…
अगदी कमी वयात “दिग्विजय “यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच यांच्यामध्ये उद्याच्या नेतृत्वाची चुणूक पावलोपावली दिसून येते. कारण दिग्विजय म्हणजे…” बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.. ” या म्हणीप्रमाणे दिग्विजय यांचा आजवरचा वादळी प्रवास..यांचा राजकीय झंझावात, अचूक निर्णय क्षमता आणि …त्यांच्या पाठीशी जमा होणारे, जीवाला जीव देणारे मित्र . व कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहता.. दिग्विजय हे भविष्यातील शिरोळ नगरीतील नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण अतिशय लहान वयात यांनी.. समाजासाठी झोकुन देणारी.. नैसर्गिक आपत्ती अडीअडचणी संकटात.. धावून येणारी.. तरुणांची फळी निर्माण केली.. आणि या संघटनेला त्यांनी… “युवा पर्व..””नवे सर्व..”.. असे नामकरण करून.. संघटन कौशल्य दाखवून दिले. या “युवा पर्वच्या” माध्यमातून.. दिग्विजय यांनी सालाबाद प्रमाणे येणारा “महापुर..”आणि यामध्ये होणारे पूरग्रस्तांचे हाल.. स्थलांतर.. अन्न.. वस्त्र निवारा.. यासाठी प्रयत्न करून बाहेरून जोडलेल्या माणसांच्या कडून शक्य तितकी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच अतिशय भयंकर अश्या ..अख्या जगाने जन्ममरणाचा खेळ अनुभवला तो म्हणजे…”कोरोना काळ.”. आणि या काळात सुद्धा.. दिग्विजय आपल्या परीने अनेक बंधू भगिनींना वयोवृद्ध.. अशा अनेक गोरगरीब लोकांची सेवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करत राहिले.युवा पर्व फाउंडेशन व शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून.. युवकांची फळी निर्माण करून.. कायम न थकता.. काहीतरी करत राहणे हा स्वभाव गुण असलेले दिग्विजय यांनी… शिरोळ नगरीमध्ये कला क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम या क्षेत्राबरोबरच मनोरंजन.. स्पर्धा.. अगदी आर्थिक पाठबळ नसतानाही चांगल्या पद्धतीने आयोजन करीत असतात.. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे.. नेत्र दीपक आणि डोळ्याचे पारणे फेडणारी.. अशी कबड्डी स्पर्धा.. अतिशय चांगल्या प्रकारे नीटनेटके नियोजन केले.. शिरोळ नगरीमध्ये प्रथमच.. अशी “हातगाडा” ही नवीन शर्यत आपल्या प्रयत्नातून पार पाडली. याचबरोबर … मुक्या प्राण्यांच्या वर दया दाखवून.. सद्यस्थितीला जनावरांच्या जीवनवरणाचा एक महाभयंकर असा रोग आलेला आहे आणि तो म्हणजे “लम्पी” होय. यासाठी दिग्विजय आणि शासकीय स्तरावर शिरोळ नगरीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांच्या गाठीभेटी घेऊन.. वेळप्रसंगी “रोग प्रतिबंधक लस” आपले पैसे घालून ही लस उपलब्ध केली.. आणि गावातील बऱ्याच अशा मोठ्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. कर्मवीर जयंतीचे अवचित्य साधून.. शिरोळ नगरीतील.. रयत शिक्षण संस्थेचे श्री पद्माराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज.. मधील गरीब.. गरजू आणि होतकरू अशा आर्थिक दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक शैक्षणिक फी भरण्याची जबाबदारी दिग्विजय माने यांनी “युवा पर्व”च्या माध्यमातून घेतली.याचबरोबर शिरोळ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये.. भव्य आणि दिव्य अशी दहीहंडी आयोजन करण्यामध्ये सिंहाचा वाटा घेतला… तसेच गणेशोत्सव मंडळांना समाज प्रबोधन पर तसेच इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत राहावी.. यासाठी या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी गणेशोत्सव काळामध्ये सजीव देखाव्यांना दिग्विजय यांनी आपल्या “युवा पर्व “च्या माध्यमातून… त्यांचे कौतुक करून.. त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर शिरोळ मध्ये प्रथमच सार्वजनिक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात दिग्विजय यांच्या नेतृत्वाखाली पार पडला , शेतकऱ्यांची तळमळ पाहता परवा झालेल्या मोठ्या प्रमाणात ऊस आंदोलनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता , शिरोळमध्ये व तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रातील निस्वार्थीपणे पुढाकार घेऊन सर्वांसाठी काम करत राहतात खरोखर समाजामधील सर्वांची दखल घेणारा.. कार्यरत असणारा.. हा आमचा दिग्विजय.. स्वतः एक प्रोफेशनल चांगला क्रिकेट खेळाडू आहे.. .. तसे त्यांचे सार्वजनिक जीवन क्रिकेट पासूनच सुरू झाले आहे सद्यस्थितीला राजकारण आणि समाजकारण या प्रक्रियेत पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन… राजकारण म्हणजे “गटारगंगा “आहे असे म्हटले जाते…. परंतु “ही गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी राजकारण आणि समाजकारणात तरुणांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हायला हवे.….”आणि या त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच …शिरोळ नगरीतील… एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले… कै.वसंतराव दत्तात्रय माने( बाबा )हे त्यांचे आजोबा व श्री संपतराव वसंतराव माने हे त्यांचे वडील ..दिग्विजय माने यांना..तसे पाहता
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना… अतिशय लहान वयापासूनच समाजकारण आणि राजकारणाची आवड बाळगून… मित्र परिवार यांचा दांडगा समूह गोळा करून…परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांचे विचार आणि काम लोकांपर्यंत पोहोचण्याचे उत्कृष्टरित्या आपल्या वकृत्वाच्या जीवावर ते पोचवत होते आणि युवकांची खंबीरपणाने बाजू ते या निवडणुकीमध्ये बजावून आमदार साहेबांच्या विजयाचे शिलेदार बनले आहेत.महाराष्ट्र राज्याचे मा. आरोग्य राज्यमंत्री शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब , शिरोळचे मा .नगराध्यक्ष मा श्री अमरसिंह माने पाटील (भैय्या) जयसिंगपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री ,संजय पाटील यड्रावकर व त्याचे सर्व गुरुवर्य मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली एक आज्ञाधारक एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून… प्रामाणिकपणे कार्यरत आहेत.
खरोखर यांच्यामध्ये समाजकारण व राजकारण करीत असताना जी धडपड लागते… ही धडपड.. उत्साह यांच्यात दिसून येत आहे.यांच्यासारख्या तरुणांनी खरोखर एक प्रसिद्धी म्हणून न्हवे तर… समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतू ठेवून समाजकारण आणि राजकारण या माध्यमातून सेवा केली पाहिजे आणि अशीच सेवा करणारे आपले परममित्र “दिग्विजय” यांना आजच्या या शुभदिनी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!
त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या इच्छा अपेक्षा संकल्पना यामध्ये यश,सुख,शांती,समाधान,धनधान्य, ऐश्वर्य,समृद्धी लाभो…!!त्यांना व त्यांच्या परिवाराला चांगले आरोग्य लाभो..! त्यांच्या पुढील सामाजिक राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!!आणि त्यांच्या उत्कर्षास.. अनेक शुभ आशीर्वाद..!! आणि त्यांच्या “दिग्विजय”या नावाप्रमाणेच त्यांचा प्रत्येक कार्यात…” विजयीभव…”प्राप्त व्हावा…!!
हा शुभाशीर्वाद…!!
वाढदिवस एका…… वादळाचा,
वाढदिवस एका….. धगधगत्या निखाऱ्यांचा,
वाढदिवस एका….. असामान्य नेत्याचा,
वाढदिवस एका….. संच्या मित्राचा,
वाढदिवस एका….. शिरोळनगरीतील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्यां…
या उत्साही “कार्यकर्त्याला” अगदी मनपूर्वक ..
पुनश्च एकवेळ….. वाढदिवस अभिष्टचिंतन…!!
सचिन पवार / विशेष