“भीषण अपघात” उदगाव येथे जुन्या पुलावरून चारचाकी खाली कोसळून तिघेजण जागीच ठार

Spread the love

उदगाव (ता.शिरोळ) येथील सांगली- कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळल्याची घटना बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे.मध्यरात्री घडलेल्या अपघाताने एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की कोल्हापूरहुन सांगलीकडे जाणारी I10 ग्रँड व्हाईट कलरची गाडी क्रमांक MH 10 DG 4385 ही गाडी पुलावरून सुमारे 180 फूट थेट खाली कोसळली या अपघातात सांगलीचे पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले.पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वय ३५ व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वय ३६ दोघे रा.मारुती रोड गाव भाग सांगली, व वैष्णवी संतोष नार्वेकर वय २१ रा.आकाशवाणी केंद्र जवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत.समरजीत प्रसाद खेडेकर वय ७,वरद संतोष नार्वेकर वय १९ व साक्षी संतोष नार्वेकर वय ४२ सर्व रा.सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत.घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीसांनी धाव घेऊन जखमींना सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले,तसेच मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.अपघात चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे अपघाताची माहीती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अधिक

तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!