इचलकरंजी / प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकार कार्यालय, इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे (बालेवाडी पुणे) येथे पार पडल्या.या स्पर्धेमध्ये डीकेटीई सोसायटीच्या इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड जुनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
कु. अभिषेक मनोज शर्मा (12 वी) याने 19 वर्षाखालील मुले गटात याने लांब उडी तसेच तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. त्याची झारखंड रांची येथे होणार्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अभिषेक शर्मा याला क्रीडा विभाग प्रमुख अमर भिसे, कॉमर्स विभाग प्रमुख श्री. खानाज यांचे मार्गदर्शन व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती कासार व सर्व शिक्षक, शिक्षकत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, व्हा. चेअरमन प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे तसेच संस्थेचे सर्व संचालकांनी अभिनंदन केले.