आलास,नांदणी येथे शासकीय अधिकारी सेक्रेटरी व शेतकऱ्यांची बैठक संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे.येत्या काही दिवसात आपली शेती रिकामी होईल.त्या दृष्टीने क्षारपडमुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे.८० टक्के शासन आणि २० टक्के शेतकरी या माध्यमातून हा प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे.शेतकऱ्यांना उर्वरित २० टक्के रकमेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात येईल,येत्या आठ दिवसात या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे, त्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे अधिकारी,विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांनी या कामाला प्राधान्य देऊन या प्रोजेक्टला गती द्यावी अशा सूचना आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या.
आलास व नांदणी येथे क्षारपडमुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट संदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी,विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले,शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून २६ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला असून ८ गावाला हा पायलट प्रोजेक्ट मंजूर झाला आहे.राज्य शासनाने शेतकऱ्यांना ८० टक्के रक्कम देणार असून २० टक्के शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.त्या दृष्टीने आलास येथे बाधित असणाऱ्या सुमारे २२५ एकर व तर नांदणी येथे १९५ एकर क्षेत्रात हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल. १ एकर क्षेत्राला राज्य शासन १ लाख २५ हजार देत आहे. तर २० टक्के रक्कम म्हणजे २९ हजार ८०० रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सदरची रक्कम शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे.सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे, शेतातील क्षेत्र रिकामी आहेत, त्यामुळे क्षारपडचा प्रोजेक्ट याचवेळी करावे लागणार आहे, अन्यथा पावसाळा सुरू झाला तर पुन्हा एक वर्ष वाया जाणार आहे, त्यामुळे शासकीय अधिकारी, गावातील सर्व सेक्रेटरी यांनी शेतकऱ्यांचे सातबारे सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून त्यांच्या फाईली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठवाव्यात त्यांना तात्काळ कर्जपुरवठा केला जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. असेही त्यांनी सांगितले.जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय यळगुडे यांनी या कामात एचडीपीई, डीडब्ल्यूसी पाईपांचा वापर होणार आहे, याचबरोबर मेन लाईन १ फूट व्यासाची असणार ही लाईन थेट नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, महापुराचा धोका ओळखून या पाईपांना नॉन रिटर्न हॉल बसवण्यात येणार आहे. जेणेकरून महापुराचे पाणी पाईपच्या माध्यमातून शेतात येणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली असल्याचे सांगितले.यावेळी आलास व नांदणी मधील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत उच्चंकी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.आलास येथे झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विजय कदम,शाखा अभियंता निशिकांत टीबे, प्रवीण वसगडेकर, फजलअली पटेल, सरपंच सचिन दानोळे, विद्याधर मरजे, जयपाल कुंभोजे, सुरेश शहापुरे, सुकुमार किनिंगे, महावीर पोमाजे, बोरगावे सर जीवनधर उपाध्ये यांच्यासह गावातील पदाधिकारी ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.नांदणी येथे झालेल्या बैठकीत पी.एल. आंबी,डॉ.सागर पाटील,सचिन बुबणे, प्रकाश लठ्ठे,शितल उळागड्डे, भूपाल शंभुशेटे, बाळगोंड खंजिरे,बाळासाहेब पाटील, प्रमोद गोपकुडे, प्रितम देमापुरे, राजू मगदूम, सचिन पाटील, संजय ऐनापुरे, सतिश पाटील, सुरगोंड पाटील, बाळासो दानोळे, रुपेश पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी, सेवा सोसायटी यांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.