नृसिंहवाडी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टी यांच्याकडून आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात अभिषेक घालून प्रार्थना करण्यात आली. श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिषेक घालण्यात आला.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये विविध विकास कामांचा डोंगर रचला होता.प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणून परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला होता. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार यासारख्या अनेक योजना राबवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.स्वच्छ व पारदर्शक कारभार व सर्वांना सोबत घेऊन त्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला होता.त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी शिरोळ तालुका भाजपाचे अनेक कार्यकर्त्यांनी नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात अभिषेक घालून प्रार्थन केली.यावेळी शिरोळ तालुका भाजपचे अध्यक्ष मुकुंद गावडे,मिलिंद भिडे, कुरुंदवाडचे नगरसेवक उदय डांगे औरंग शेख,उमेश करडे , अब्बुदिन मुजावर, पोपट पुजारी, मुकुंद पुजारी, हनुमंत रजपूत, रामराज पाटील, मनोज पाटील, वर्षा पाटील ,वैशाली ठोके यांच्यासह दीडशेहून अधिक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .