जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथे महालक्ष्मी नगरमध्ये राजेंद्र नेमीनाथ मोने यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम, दुचाकी मोटरसायकल असा एकूण 2 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.याबाबतची फिर्याद राजेंद्र मोने यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,मोने यांच्या घराचे कुलूप चोरट्यांनी फोडून घरात प्रवेश केला.व घरातील सोन्याचा तुकडा,चैन,लहान मुलांच्या अंगठ्या,चांदीचा खुळखुळा, अंगठी,कानातील झुबे,रोख 35 हजार रूपये व घरासमोर लावलेली मोपेड दुचाकी असा एकूण 2 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केली आहे.अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.