शिरोळ / प्रतिनिधी
संभाजीपूर ( ता.शिरोळ ) येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील तिजोरी मधील २ लाख ३५ हजार रुपयाच्या सोन्याच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मंगळवार दि २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२वा ते रात्री ८ . ३० च्या सुमारास के . पी . टी कॉलनी बायपास रोड संभाजीपूर येथे घडली या बाबतची फिर्याद दिनकर हरी कांबळे यांनी अज्ञात चोरटच्या विरोधात दिली आहे .
पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी फिर्यादी दिनकर कांबळे हे आपल्या घराला कुलूप लावून गेले होते रात्री परत आल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप कशानेतरी काढून अज्ञात चोरट्याने तिजोरीतील ९० हजार रुपयाचे १८ गॅम वजनाचे सोन्याच्या साखळीतील मिनी घंटण , ३० हजार रुपयाचे ६ ग्रॅम वजनाचे झुबे , २५ हजार रुपयाचे ५ ग्रॅमचे सोन्याचे टॉप , १५ हजार रुपयाचे ३ ग्रॅम दोन रींगा , २५ हजार रुपयाची ५ ग्रॅमची अंगठी , २० हजार रुपयाची ४ ग्रॅम लेडीज अंगठी, ५ हजार रुपयाचे सोन्याचे मणी , २५ हजार रुपयाचे काळ्या मण्यातील ५ ग्रॅमचे मंगळसुत्र , असा एकुण २ लाख ३५ हजार रुपयाचा ऐवज घेवून अज्ञात चोरट्याने पोबारा केला . शिरोळ पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलीस निरिक्षक शिवाजी गायकवाड हे करीत आहेत .