इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी डीकेटीई संस्थेच्या कॉमर्स कॉलेजचा क्रीडामहोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटनप्रसंगी नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी उमेश सातपुते यांच्या हस्ते क्रीडाज्योतीचे प्रज्वलन व ध्वजारोहण करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक कॉलेजच्या प्राचार्या सौ. भारती कासार यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शनही केले. कॉमर्स विभागप्रमुख खानाज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. क्रीडा मोहत्सवाची सुरुवात क्रीडाप्रतीनिधी कु. वंशिता रागवाणी या विद्यार्थीनीने शपथ घेऊन केली.
कु. झलक सोमाणी या विद्यार्थीनीने क्रीडा अहवाल सादर केला. क्रिडा विभाग प्रमुख अमर भिसे यांनी क्रीडामहोत्सवाचे उत्तमरित्या आयोजन केले होते. श्री. सावंत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. हा क्रीडामहोत्सव यशस्वीरित्या पार पडण्यात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.