कासारवाडी येथे गव्याच्या कळपाचा धुडगूस,५ एकरातील शाळु पिकं केलं फस्त

Spread the love

पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे

कासारवाडी येथी लुगडे माळ परिसरात दहा गव्यांच्या कळप दाखल झाला असून जवळपास चार एकरातील शाळू पिके खाऊन फस्त करुन धुडगूस घातला आहे
कासारवाडी येथिल घाटगे खोरी लुगडे माळ, खाडे माळ, नावाच्या शिवारातील गोविंदा खोत , बाळु खाडे, पंडित घाटगे,सुखदेव घाटगे ,संजय मोहिते तर सादळे येथील सिध्देश्वर मंदिर परिसरातील श्रीरंग पोवार ,बाळकृष्ण पोवार .या़च्या शेतातील जवळपास चार एकरातील शाळवाचे कोवळ पिकं खाऊन संपवल्यान शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सध्या रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा ही पिक शेतात आहेत तसेच आडसाली ऊस लावणी आहेत हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी ,‌अंबपवाडी मनपाडळे तर करवीर तालुक्यातील सादळे मादळेमध्ये येतील शेती पिकांमध्ये गव्यांच्या कळपाकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. शेतीची मशागत करत बियाण्याचा खर्च करून आलेले पिक गव्यांच्या कळपाकडून फस्त केली जात आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचण येत आहे वर्षभराचे पीक कसे काढायचे अशा तक्रारी शेतकरी करत आहेत. गव्यांचा कळप वारंवार या परिसरातला ज्वारी मका या पिकांवर डल्ला मारत आहे. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून शेतकरी आक्रमक झाले आहेत. वन्य प्राण्यांपासून पिकांच्या बचावासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या करत असतात यातून वन्य प्राणी किंवा एखाद्या शेतकऱ्यांचा जीव जाण्याची ही शक्यता नाकारता येत नाही ते घडण्या अगोदरच वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरयांच्याकडून होत आहे.

 

चौकट

वनविभागाशी संपर्क साधला असता वनक्षेत्रपाल करवीर आर एस कांबळे यांनी तातडीने रेस्कु टिम ,वनरक्षक यांना या ठिकाणी पाठवुन दिले व उद्या शेतकऱ्यांच्या नुकसानिचे पंचनामे करून नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशी विनंती केली )सायंकाळी पुन्हा ज्या शेतामध्ये शाळू खाण्यासाठी गवे गेले होते त्याच शेतामध्ये पुन्हा गावे आले होते त्यावेळेस तेथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांना खुशकावून लावले असता गवे अंबप येथील जंगलामध्ये गेले आहेत वन विभाग व रेस्क्यू टीम तेथे पोचली परंतु त्यांना ते गवे आढळून आले नाहीत

error: Content is protected !!