“या” काव्यपंक्तीमुळे शिरोळ वासियांच्या “गुरुजी” कायम स्मरणात

Spread the love
शिरोळ नगरीचे आराध्य ग्रामदैवत म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेले श्री बुवाफन महाराज व नूरखान बादशहा यांचा उत्सव आणि उरूस हा दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन करत असतात…हा उरूस महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भक्तगण यांनासुद्धा याचा प्रत्यय आल्याने यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात या उरूसाची उलाढाल होत असते. आशा या भव्य आणि दिव्य उरूस म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा रोमहर्षक आणि अध्यात्मिक… ऐतिहासिक धार्मिक.. क्षण असतो..
    अशा या सर्व धर्मियांचे… सलोख्याची… ऐक्याची भावना जोपासणारा आपला शिरोळ चा “श्री बुवाफन महाराज उत्सव आणि नूरखान बादशाह उरूस”होय. अशा या उरुसाला भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी शिरोळ मधील अनेक लोकांनी आपापल्या परीने योगदान दिलेले आहे..अशा या महान व्यक्तींची आठवण आज सुद्धा आपल्या स्मरणात आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रथमता उल्लेख करावा लागेल तो म्हणजे…या ऊरसाची जाहिरात जेव्हापासून निघाली या जाहिरातीमध्ये शिरोळच्या या उरुसाचे सर्व धर्मीयांचे ऐक्याचे वर्णन काव्यपंक्ती मध्ये अतिशय कमी अक्षरांमध्ये चांगल्या प्रकारे केले ते म्हणजे आमच्या शिरोळ गावचे गुरुवर्य श्रीयुत द.आ.माने (गुरुजी) यांनी…ते म्हणतात… “शिरोळ ग्रामी थोर इतिहास घडला..सत्पुरुष बुवाफनच्या भक्तीचा डंका झडला…सर्व धर्मियांनी मिळून उरूस साजरा होऊ लागला.. देशाच्या एकात्मतेचे प्रतीक हो झाला…”ही काव्य पंती रचना करणारे गुरुवर्य श्रीयुत द. आ.माने गुरुजी यांचे निधन झाले…परंतु या काव्यपंक्ती मुळे शिरोळ वासियांच्या ते कायम स्मरणात राहतील…
error: Content is protected !!