शिरोळमध्ये आज उरुसाचा मुख्य दिवस ; धार्मिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिरोळ / प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सवाची सांगता झाल्यानंतर बुधवारपासून हजरत नुरखान बादशाह उरुसाला प्रारंभ झाला आहे . बुधवारी रात्री चर्मकार समाजासह अन्य पारपारिक मानकरी , भक्तगण व मान्यवरांच्या उपस्थितीत येथील हजरत नुरखान बादशहा दर्ग्यात गंध लावणे व मानाचा गलेफ वाहून गंधरात्र सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अबाल वृद्धासह भाविकांची दर्ग्यात दर्शनासाठी गर्दी होती.दरम्यान , उरुसाचा आज ( गुरुवारी ) मुख्य दिवस असून धार्मिक कार्यक्रमासह दिवसभरात विविध स्पर्धा ,शर्यती तसेच रात्री करमणूकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.येथील बसस्थानक नजीक असणाऱ्या हजरत नुरखान बादशहा दर्ग्यात सकाळी पुजारी बशीर देवर्षी यांनी पूजा – अर्चा केली. बुधवारी रात्री पारंपारिक मानकरी व भक्तगणांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणुकीने हजरत नुरखान बादशहाच्या तुरबतीस गंध लावणे व गलेफ वाहण्याचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी चर्मकार समाजाचे नायकू माने , डॉ दगडू माने , शिवाजी माने ,शंकर माने , माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील , अजिंक्यसिंह पाटील , दिलावर कुरणे ,
अजित कुरणे, श्रीकांत पाटील ,तानाजी पाटील , प्रवीण जगदाळे , अनिरुद्ध जगदाळे ,नेताजी पाटील , शिवराज पाटील ,योगेश पाटील , लाला माने, विनायक माने ,
परवेज मिस्त्री, बशीर देवर्षी, सुलतान देवर्षी , पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह उरुस समितीचे अध्यक्ष केतन चव्हाण , संकेत कोळी, महेश काळे, चंद्रकांत भाट , सागर भाट , विलास पाटील आदि उपस्थित होते .
दरम्यान , श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशहा उरूस म्हणजे हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे गेल्या चार दिवसापासून सुरू झालेल्या या उत्सव व उरूस कार्यक्रमाला कोल्हापूर , सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातून भाविकांची उपस्थिती लाभली आहे.