डॉ अशोकराव माने यांच्या विजयासाठी केलेल्या जोडण्या यशस्वी
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळचे सुपुत्र आमदार,दलित मित्र,आमदार डॉ. अशोकराव माने यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यानी विजय मिळवला. आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या यशामध्ये त्यांचे सुपुत्र भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष आणि शिरोळचे माजी नगरसेवक डॉ. अरविंद माने यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांनी केलेल्या परफेक्ट नियोजनामुळे,हातकणंगले विधानसभा मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम होऊन आमदार डॉ. अशोकराव माने हे पहिल्यांदाच राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचले आहेत.सन २०१९ साली दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली.यावेळी अचानक मिळालेली उमेदवारी,नवखा असणारा मतदारसंघ आणि अल्पकाळात केलेला प्रचार त्यामुळे या निवडणुकीत त्यांना अपयश आले.पराभवाने खचून न जाता निवडणुकीचा निकाल लागलेल्या दुसऱ्या दिवसापासून दलित मित्र आमदार डॉ.अशोकराव माने हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात पुन्हा जोमाने कामाला लागले.सततचा लोकसंपर्क आणि आपल्या प्रयत्नातून राज्य शासनाकडून विकास कामासाठी आणलेला निधी.यामुळे या मतदारसंघात दलित मित्र डॉ अशोकराव माने हे २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून प्रबळ उमेदवार म्हणून प्रचारही सुरू होता.गेली पाच वर्षे आमदार डॉ.अशोकराव माने यांच्याबरोबरच त्यांचे सुपुत्र भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष आणि शिरोळचे माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने यांनीही या मतदारसंघात आपला लोकसंपर्क वाढवला होता.या मतदारसंघातील तरुणांची फौज एकत्रित करून गावच्या विकासाकरिता प्रयत्न करण्यासाठी त्यांना अश्वस्त केले होते.जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार डॉ.विनय कोरे आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून विकास कामाकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.यामुळे आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांच्याबाबत मतदारसंघात सहानुभूतीची लाट निर्माण झाली.डॉ.माने पिता पुत्रांनी गेली पाच वर्षे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत जनतेची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.शिवाय कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन जनतेसोबत असणारे जिव्हाळ्याचे नाते घट्ट केले.या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या प्रचाराची धुरा डॉ.अरविंद माने यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन आमदार डॉ.माने यांचे कार्य घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला.तसेच महायुतीचे घटक पक्ष भारतीय जनता पार्टी,एकनाथ शिंदे शिवसेना,जनसुराज्य शक्ती,आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याबरोबर सातत्याने संपर्क ठेवून प्रचाराचे करेक्ट नियोजन केले.तसेच नाराज असलेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करत या सर्वांना प्रचारात सक्रिय करून आमदार डॉ.माने यांची प्रचाराची बाजू भक्कम केली.आपले वडील महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जावेत यासाठी डॉ.अरविंद माने यांनी परफेक्ट नियोजन करत राजकीय जोडण्या लावल्या. मतदार संघातील विकास कामे पूर्ण करण्याबरोबरच जनतेला मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी माने कुटुंबीय अहोरात्र प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी या मतदारसंघातील जनतेला दिला.शिवाय त्यांनी प्रचाराच्या कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला तेथील जनतेचे प्रश्न समजावून घेतले.प्रचारादरम्यान महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन केले. अनेक ठिकाणी बैठका घेऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.भाजपा सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील हे वेळोवेळी निवडणूक काळात डॉ.अरविंद माने मार्गदर्शन करत राहिले.त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गोवा राज्याच्या मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या दौऱ्याचे नियोजन लावून दिले.या दौऱ्यात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन डॉ. माने यांची विजयाची बाजू भक्कम केली.डॉ.अरविंद माने यांनी केलेल्या परफेक्ट नियोजनामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम होऊन आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने हे महाराष्ट्राच्या सर्वोच्च विधानसभेच्या सभागृहात पोहोचले आहेत.
महत्वाची चौकट
युवकांची संघटनात्मक ताकद डॉ.अरविंद माने हे भारतीय युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी हातकणंगले विधानसभा मतदार संघातील युवा मोर्चातील युवकांना संघटित करून महायुतीचा जाहीरनामा घराला घरात पोहोचवला. युवकांचा प्रचारातील सक्रिय सहभाग प्रभावित ठरला.मतदाना दिवशी या सर्व युवकांनी मतदानाचा टक्का वाढवण्याबरोबरच मतं आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांना मिळावीत यासाठी पुढाकार घेतला.डॉ.अरविंद माने यांनी या मतदारसंघात युवकांची संघटनात्मक ताकद निर्माण केली.