सातपुते – कोळी टोळीत राडा,शिरोली पोलिसात सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल

Spread the love

पु.शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

आपल्या विरोधी गटाचा एक जण नागाव येथे घरगुती वाद मिटवण्यासाठी येणार असल्याचा सुगावा लागताच दहा ते बारा जणांच्या टोळीने काठ्या व दगडफेक करत हल्ला केला यामध्ये एकास मारण्याचा प्रयत्न केला . पण तो किरकोळ जखमी झाला.हे दोन्ही गट पुलाची शिरोली येथील असून त्यांच्यात गेल्या काही वर्षांत टोळी युद्ध सुरू आहे.दोन्ही गट एकमेकाच्या जिवावर उठले आहेत . यातुनच गुरूवारी रात्री नागाव येथील चौगुले काँलणी येथे ही घटना घडली.पोलिसानी वेळीच धाव घेतल्याने दोन्ही गटाच्या लोकानी घटनास्थळावरून पळ काढला . शिरोलीतील या दोन्ही टोळ्यांमध्ये टोळी युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुलाची शिरोली येथील माळवाडी भागातील कोळी व सातपुते दोन्ही गटात गेली वर्षभरापासून वादाला सुरूवात झाली हा वाद एकाच्या जिवावर बेतला होता पण नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जिव वाचला होता.तेव्हापासून दोन्ही टोळीतील लोक एकमेकांच्या जिवावर उठले आहेत . गुरूवारी रात्री नऊ वाजण्यासुमार नागांव येथील चौगुले काॅलणी शेजारी असणार्या एका घरात घरगुती वाद मिटवण्यासाठी विनायक कोळी आपल्या सहकाऱ्यांसह येणार आसल्याची माहिती सातपुते गटाला मिळाली ते कोळीच्या मागावर होते. तो येण्याची वाट पाहत रस्त्यावर होते कोळी येताच तोंड बांधून आलेल्या सातपुते टोळीने कोळी याच्यावर हल्ला केला.परिसरातील काही लोक वाद सोडवण्यासाठी गेल्यावर दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक चालू केली या वादाची माहिती शिरोली पोलिसाना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येताच दोन्ही टोळ्यानी पलायन केले.शिरोली पोलिसानी परिसरातील सिसिटिव्ही फुटेच तपासले असता हातात काट्या,दगडे असल्याने दिसत आहे त्यानुसार शिरोली पोलिस दोन्ही टोळीच्या तरूणांचा शोध घेत आहेत.शुक्रवारी रात्री पोलिसात तक्रार दाखल झाली असून याबाबतची फिर्याद विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी याने विकास धनवडे,अली तानीखान,कार्तिक राजुरीकर,अनिकेत कांबळे,विकी सनदे,प्रताप भोरे, श्रीकांत मोहिते,सॅन्डी आवळे व सर्व रा.विलासनगर शिरोली पुलाची व तोंड बाधुन ८ ते १० व इतर जणांच्यावर तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास सपोनि सुनील गायकवाड करित आहेत.

error: Content is protected !!