पु.शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंचाच्या दोन लक्झरी चार चाकी गाड्या भाऊबंदकीच्या पुर्व वैमनस्यातून फोडून ३ आरोपी फरार झाली असून यामध्ये ५ लाखाचे नुकसान झाले असल्याची फिर्याद अभिजीत अनिल कोळी याने विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी 2)अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी 3) अनिल माने उर्फ जॅकी (पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात शिरोली पोलिसात दिली आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी कि आरोपी विनायक लाड उर्फ कोळी,अनिकेत लाड उर्फ कोळी हे अभिजीत कोळी यांचे चुलत भाऊबंद असून त्यांच्या स्क्रॅपच्या व आर्थीक व्यवहारावरून पूर्वीपासून वाद सुरू असल्याने त्यांच्यात नेहमीच वादाचे प्रसंग घडल असल्याने शुक्रवारी १२ वाजण्यासुमार विनायक लाड उर्फ कोळी,अनिकेत लाड उर्फ कोळी, व अनिल माने उर्फ जॅकी हे तिघे पांढ-या रंगाच्या चारचाकी फोर्ड अँस्पायर गाडी क्रमांक एम एच 09 ,0764 मधुन शिरोली येथे माजी उपसरपंच कोळी यांच्या घराजवळ येवून दारात लावलेल्या फोरच्युनर गाडी क्रमांक एम एच 09 एफ एल 0047 या गाडीचे समोरील व उजव्या बाजुचे काचा एडक्याने फोडुन पुढील बोनेटवर टोकदार हत्यार मारुन तेथील पत्रा फाडुन व चेपुन अंदाजे 3,00,000/- रुपये नुकसान केलेले आहे तसेच थार गाडी क्रमांक एम एच 09 जे के 0047 या गाडीचे दोन्ही बाजुच्या व पाठीमागील काचा व आरसा फोडुन अंदाजे 2,00,000/- रुपये नुकसान केले व घरावर दगडफेक करुन हातात एडका घेवुन आजुबाजुला दहशत माजवुन कोळी यांच्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी देवून फरार झाले.विनायक कोळी याच्यावर नागांव येथे सातपुते गँगने जिवघेणा हल्ला केल्याने कोळी याने शुक्रवारी शिरोली पोलिसात सातपुतेच्या विरोधात तक्रार दाखल केले अन रात्री १२ वाजता आपल्याच भाऊबंदांच्या गाड्या फोडून दहशत माजवल्याने विनायक कोळी याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण करत आहेत.