“केवळ अफवा” बर्गेवाडी येथील मतदान केंद्रावरील बातमी चुकीची – जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love

राधानगरी बर्गेवाडी येथील मतदान केंद्रावरील

ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड होऊन मतदान करताना बटन दाबताना दुसऱ्या उमेदवाराला मत पडत असल्याची बातमी प्रसिद्ध होत आहे.मात्र तसा कोणताही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही याबाबत संबंधित बर्गेवाडी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांशी चौकशी केली आहे तसेच तेथील उमेदवारासोबत ही चर्चा झाली असून बर्गेवाडीतील बातमी चुकीची आहे.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोशल मीडियाद्वारे मतदारांना केले आहे.

error: Content is protected !!