पवार साहेबांच्यावर टिका केली तर खपवून घेतले जाणार नाही – विक्रमसिंह जगदाळे

Spread the love
शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशिल माने हे आपल्या भाषणातून शरदचंद्र पवार यांच्यावर टिका करीत आहेत. पण त्यांनी लक्षात घ्यावे की, त्यांच्या मातोश्री यांचा दोनवेळा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला.त्यानंतर शरद पवार यांनी उमेदवारी देवून दोनवेळा खासदार केले. शरदचंद्र पवार यांच्या तिकिट दिल्यामुळे शिरोळ तालुक्यातील जिल्हापरिषद मतदार संघातून खासदार धैर्यशिल माने यांच्या राजकिय कारकिर्द सुरु झाली. ते आता मोठे नेते झाले आहेत. त्यांना या सर्व गोष्टीचा विसर पडला आहे.त्यांनी यापुढे शरद पवार साहेबांच्यावर टिका केली तर खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी आज रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिरोळ येथे केला.
error: Content is protected !!