हातकणंगले विधानसभेतील महायुतीचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने यांच्या सुनबाई जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष नीता माने यांनी मतदार संघामध्ये प्रचार करत असताना महागाई वरून भाजप सरकारवर विरोधक टीका करत आहेत त्या विरोधकांना सांगायचा आहे की 500 रुपये मध्ये तेल,साखर, दूध ,तूप लोणी सहित महिन्याचा घरखर्च होतो असा व्हिडिओ शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर वरून व्हायरल केल्याने हात करणे मतदारसंघांमध्ये खळबळ उडाले आहे.सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विमध्ये पाचशे रुपये मध्ये घर खर्च चालतो असा असा दिव्यशोध यांनी लावला आहे चला आपण यांचे अभिनंदन करूया म्हटले आहे.
