शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ विधानसभा निवडणुक सद्या जिल्ह्यात चर्चेत आली असून ती म्हणजे मा खा राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी व मा आम उल्हास पाटील यांचे सुपुत्र किशोर पाटील हे दोघे आपल्या बापाच्या सन्मानासाठी शिरोळ तालुक्यात घर टू घर जाऊन प्रचार करत आहेत.एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडून कार्यकर्ते शेट्टीच्या विरोधात प्रचार करत शेट्टींना कोंडीत पकडलं आहे.तर दुसरीकडे शिवसेनेने २०१९ च्या निवडणूकीनंतर विरोधातील निवडून आलेल्या आमदारांना शिवसेनेत प्रवेश देत त्याला राज्यमंत्री पद देऊन शिवसेनेने स्वतःच्या उमेदवारालाच खाली खेचले अशी नाराजी व्यक्त करत मा आमदार उल्हास पाटील यांनी शिवसेना सोडली,तर पक्षाच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी उल्हास पाटील यांच्याकडे पाठ फिरवत आघाडी धर्म पाळला आहे.त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एकटे पडलेल्या राजू शेट्टी व उल्हास पाटील या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांचे सुपुत्र राहिले आहेत.वडिलांचा सन्मानासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जनतेसाठी केलेल्या विकास कामांचा जोरावर या विधानसभा निवडणुकीत साथ देण्याचे आवाहन दोघांचे सुपुत्र मतदारांना करत आहेत.