जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने तालुक्यात परिवर्तन होणार

Spread the love

अकिवाट / प्रतिनिधी

सामाजिक,सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करून सामान्य जनतेशी नाळ जोडून गणपतराव पाटील दादा हे काम करीत आहेत.गणपतराव पाटील दादा यांच्या कामाला बळ देण्यासाठी मी प्रहार जनशकती पक्षाचा राजीनामा देऊन त्यांच्या विजयासाठी काम करीत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होण्यापेक्षा केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे.जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून तालुक्यात परिवर्तन होणार आहे. विधानसभा निवडणुकीत गणपतराव पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे मत शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉ. दगडू माने यांनी व्यक्त केले.अकिवाट (ता शिरोळ ) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील (दादा ) यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रा, रॅली काढल्यानंतर झालेल्या विजय निश्चय सभेत ते बोलत होते.यावेळी डॉ दगडू माने म्हणाले, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ३५ वर्षे काम करताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून ७ वर्षे सामाजिक काम केले आहे.

error: Content is protected !!