गणपतराव पाटील यांच्या घालवाड येथील पदयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

घालवाडकरांनी घेतली गणपतराव पाटील यांना निवडून देण्याची जबाबदारी

शिरोळ / प्रतिनिधी

घालवाड येथे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा आणि कॉर्नर सभा घेण्यात आली.मतदारांचा यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणपतराव पाटील यांच्या विजयासाठी सर्वजण एकजुटीने काम करून त्यांना निवडून देण्याची जबाबदारी घेतली.यावेळी भगवान खोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.पृथ्वीराजसिंह यादव,विकास पाटील, सुरेश जाधव,अनिल खाडे,गणेश साळुंखे, कविता चौगुले,दत्तात्रय लाळगे,सतीश खोंद्रे,भाऊसाहेब खोंद्रे, भगवान खोंद्रे,स्वाती सासणे,शुभम कांबळे आदींनी गणपतराव पाटील यांच्या कामाचा आढावा घेऊन निवडून देण्याचे आवाहन केले.गणपतराव पाटील यांनी आमदार म्हणून आपण कोणती विकासाची दृष्टी घेऊन काम करणार आहोत याची माहिती दिली.स्नेहा देसाई, गिरीश कंदले, संभाजी कांबळे, मारुती तिटवे, संजय अनुसे, अनिल गायकवाड, सतीश खोंद्रे, देवा इंगळे, अनिल कदम, दिनकर नाईक, गोरख खोंद्रे, किशोर तिटवे, जमीर जमादार, जगन्नाथ लाळगे, तानाजी जनवाडे, रावसाहेब कदम, रामा मगदूम, संभाजी खोंद्रे, राजेंद्र प्रधान, डॉ. दगडू माने, कबीर भंडारे, रमेश शिंदे, नामदेव पाटील, सुरजकुमार परीट यांच्यासह ग्रामस्थ मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!