“शिट्टीचा आवाज अद्याप निघेना”,धरणगुत्तीत थोरल्या दादांचा घर टू घर प्रचार जोरात…

Spread the love

धरणगुत्तीत थोरल्या दादांचा घर टू घर प्रचार जोरात….शिट्टीचा आवाज अद्याप निघेना

संभाजी जाधव / विशेष

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा धरणगुत्तीत उडत आहे.थोरल्या दादांच्या हाताचा प्रचार घर टू घर सुरू आहे.मात्र येथे साहेबांच्या शिट्टीचा आवाज अद्याप निघेनासा झाला आहे.साहेबांच्या कार्यकर्त्यांचा गटार्तंगत प्रचार मात्र कांही प्रमाणात दिसून येत आहे.प्रचाराच्या पहिल्या टप्यातच दादांच्या हाताने येथे साहेबांच्या शिट्टीची हवा काढून घेतल्याची चर्चा नांदणी जिल्हा परिषद मतदार संघातील नांदणी,धरणगुत्ती,हरोली, जांभळी,कोंडीग्रे या सहा गांवात सुरु झाली आहे.बाकी धरणगुत्तीत साहेबांनी प्रचाराचे सुत्रधार बदलावेत असा सुर साहेबांच्यावर प्रेम असणाऱ्या मतदारांतून उमटत आहेत.

error: Content is protected !!