शिरोळ तालुक्याचा किती आणि वैयक्तिक किती विकास झाला – शिंदे

Spread the love

जातीयवाद्यांच्या मांडीवर जाऊन बसलेल्या आमदाराला जागा दाखवा – दलित पँथरचे रमेश शिंदे

शिरोळ / प्रतिनिधी

गेल्या निवडणुकीत दलित मुस्लिम आणि सर्व बहुजन समाजाने पाठिंबा देऊन राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आमदार केले. पण आपण ज्यांच्यामुळे आमदार झालो त्यांनाच ते विसरले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रश्नावर आंदोलकावर लाठी हल्ला झाला हे आपण कसे विसरू शकतो? जे आमदार विकास कामे केली असे सांगत आहेत, त्यामधून गावांचा विकास न होता त्यांचा वैयक्तिक विकास झाला आहे. त्यामुळे या फसव्या आमदाराला कोणताही थारा देऊ नका. जातीयवाद्यांच्या मांडीवर जाऊन बसलेल्या या आमदाराला सर्वांनी जागा दाखवणे गरजेचे आहे. गरिबांच्या सुखदुःखात सहभागी असणाऱ्या गणपतराव पाटील दादांना 50 हजार मतांनी निवडून आणूया, असे आवाहन दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले.
राजापूर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. प्रारंभी राजापूर गावांमधून प्रचंड मोठी पदयात्रा काढण्यात आली. महिला मतदारांनी मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
शिवसेनेचे मधुकर पाटील म्हणाले, जगायचे कसे असा प्रश्न असताना गेल्या पाच वर्षांमध्ये जाती-जातीमध्ये विष पेरण्याचे काम झाले आहे. सर्वांचा पाठिंबा घेऊन आमदार झालेल्यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून का लढत आहेत? याचे उत्तर त्यांनी देणे आवश्यक आहे. त्यांनी सर्वांनाच फसविले आहे. राजापूर गावाला नीट रस्ते नाहीत की अन्य सोयी सुविधा नाहीत. हजारो कोटींची विकास कामे झाली असे म्हणतात, पण एवढा मोठा निधी कुठे गेला? हा प्रश्नच आहे.
मौलाभाई पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा गणपतराव पाटील यांना देऊन म्हणाले, गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे नाव घेतल्याने आम्ही अपक्ष उमेदवाराला निवडून दिले, पण आम्ही चुकलो अशी आमची आत्ताची भावना आहे. शरद पवार यांनी त्यांना सर्वकाही दिले. पण त्यांनी केलेली गद्दारी हे आम्हा जनतेला पटलेले नाही. गद्दारी, लाचारी करायला अक्कल लागत नाही पण गणपतराव पाटील दादांसारखे निष्ठावंत स्वाभिमानी राहण्यामध्ये अक्कल लागते, असे सांगून त्यांनी महायुतीच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले. पृथ्वीराजसिंह यादव, माजी सरपंच रतनगोंडा पाटील, आरिफभाई मुजावर, कु. बुशिरा खोंदू, शुभम कांबळे, पिंटू कांबळे, कृष्णा बनसोडे यांनी शंभर टक्के पाठिंबा देऊन गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. उमेदवार गणपतराव पाटील यांनी गावच्या सर्व अडीअडचणी आणि समस्यावर उपाय शोधून कामे करणार असल्याचे सांगितले. त्याच पद्धतीने पूर परिस्थिती, पाणी प्रश्न, आरोग्य अशा सर्वांगीण विकासाची दृष्टी ठेवून तुमचा ‘जनतेचा आमदार’ म्हणून काम करण्याची भूमिका राहील असे स्पष्ट केले.
यावेळी राजापूर ग्रामस्थांच्या वतीने गणपतराव पाटील यांना 25 हजार रुपयांचा निवडणूक निधी सुपूर्द केला. प्रारंभी स्वागत मोहन ढवळे यांनी केले. माजी सरपंच संजय पाटील, शहाबुद्दीन जमादार, नवाज खोंदू यांनी पक्षप्रवेश केला. आभार धुळाप्पा दिवटे यांनी मानले. यावेळी शिवसेनेचे वैभव उगळे, स्नेहलता देसाई, वसंतराव देसाई, कविता चौगुले, शंकर पाटील, जावेद जमादार, शहाजहान जमादार, अल्ताफ जंगले, चंद्रकांत आवटे, सातगोंडा पाटील, पिरगोंडा पाटील, बाबगोंडा पाटील, विजयकुमार खोत, बाबासो जमादार, सलीम जमादार, बाळू खोंदू, रमजान खोंदू, काशिनाथ पाटील, बाबासो मकानदार, शरफुद्दीन मकानदार, चंदू आंबी, संजय पाटील, अब्बास खोत, बाबासो सापळे, मियाँसो जमादार, रशीद दानवाडे, वसंतराव देसाई, दिनेश कांबळे, संजय कांबळे, सुरेश कांबळे, सुनील कुरुंदवाडे, बाबासो जमादार, संजय कोरे, पायाप्पा मांग, नासिर मकानदार, सद्दाम म्हैशाळे, राजकुमार खोत यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजापूरवाडी येथे झालेल्या प्रचार सभेत भवानीसिंग घोरपडे यांनी शिरोळ तालुक्याच्या दर्जेदार विकासासाठी गणपतराव पाटील यांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. वाल्मिकी कोळी यांनी काँग्रेसच्या पाठीशी जनता शंभर टक्के राहील असा विश्वास व्यक्त केला. कु. आफिया दानवाडे, राजू आवळे, वैभव उगळे, स्नेहा देसाई, शुभम कांबळे, स्वाती सासणे आणि गणपतराव पाटील यांनी महाविकास आघाडीची भूमिका मांडली.यावेळी श्रीकांत कोळी, प्रदीप कोळी, समीर दानवाडे, मुनीर दानवाडे, संजय सोलापुरे आप्पासो खोत, अण्णासो बुधाळे, एकनाथ पाटील, उस्मान दानवाडे, दत्तात्रय कदम, प्रदीप कोळी, अभिजीत कोळी, अशोक खोत, अनिल पाटील, आपगोंडा पाटील, सद्दाम एकसंबे, सद्दाम सौदागर, सलीम दानवाडे, सिकंदर कौजलगे, अक्षय गायकवाड, रामा कोळी, संतोष गोते, चिदानंद हिंगमिरे यांच्यासह मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!