शिरोळ विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी समाजाने आपली ताकद दाखवावी – स्वाती सासणे
जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात विधानसभेची रणधुमाळी चालू आहे यामध्ये प्रत्येक उमेदवाराने आपली प्रतिष्ठा पनावर लावली आहे हे जरी खरे असले तरी जयसिंगपूरच्या क्रांती चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे हे सर्वांचे कर्तव्य असून क्रांती चौकात पूर्णाकृती पुतळा उभा राहावा यासाठी आंबेडकरी समाजाने अखंडपणे साखळी उपोषण,तिरडी मोर्चा, जयसिंगपूर नगरपालिकेवरील हल्लाबोल मोर्चा ,जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला मोर्चा या सर्व बाबींचा विचार करता जयसिंगपुरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे शक्य होते.ते उभारत असताना विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सगळ्यात पुढे येऊन ही मागणी मान्य करून मोठ्या थाटामध्ये पुतळ्याचा लोकार्पण सोहळा करण्याऐवजी या पूर्णाकृती पुतळ्यामध्ये राजकारण करण्यात आले.
आणि यामध्ये आंबेडकरी समाजाला पूर्णाकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात दिशाभूल करून आंबेडकरी समाजात दोन भाग पाडून फार मोठे राजकारण करून आपले अस्तित्व अबाधित ठेवण्याचे काम राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले, असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी आंदोलन करीत असताना स्थानिक लोकांनी आंदोलनामध्ये हस्तक्षेप करून काही अज्ञात लोकांच्याकडून आंदोलनाला वेगळे स्वरूप देण्यात आले आणि त्यामध्ये आंबेडकरी समाजावर पोलिसांनी हल्ला केला .पाटीवर वळ उठेपर्यंत ,हात पाय ,मोडूपर्यंत तसेच लहान छोट्या मोठ्या मुलांना सुद्धा मारहाण करण्यात आली न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भीमसैनिकांवर अमानुष हल्ले करून त्यांना तुरुंगात डांबण्याची काम स्थानिक आमदारांनी केली तसेच त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करून त्याचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम स्थानिक आमदाराने केले असून या पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाहीच्या माध्यमातून दंडूकशाहीला शांत बसवण्यासाठी आणि पाठीवर झालेली जखम भरून काढण्यासाठी या पंचवार्षिक निवडणुकीत आंबेडकरी समाजाची ताकद दाखवण्यासाठी आणि झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आंबेडकरी समाजाने एकजुटीने एकमताने निर्भय आणि निर्भीडपणाने गणपत दादा पाटील यांना आमदार करून क्रांती चौकातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न पूर्ण करन्यासाठी गणपत दादा पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन स्वाती सासणे यांनी केले आहे.