‘चला घडवूया आदर्श मुलं’ २४ नोव्हेंबरला होणार प्रकाशित

Spread the love

डॉ.रोहित परीट यांच्या द्वितीय पुस्तक ‘चला घडवूया आदर्श मुलं’ २४ नोव्हेंबरला प्रकाशित होणार.

हेरवाड / प्रतिनिधी

 

रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी साहित्य विकास मंडळ,कारदगा ता.निपाणी यांचे वतीने आयोजित २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २०२४ संपन्न होत आहे.कै. रावसाहेब (दादा)पाटील साहित्य नगरी,कै.महादेव मोरे व्यासपीठ डी.एस. नाडगे कॉलेज पटांगण,कारदगा येणे रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मुलांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वासाठी अनमोल मार्गदर्शिका असणारी नवोदित लेखक डॉ. रोहित विजय परीट लिखित ‘चला घडवूया आदर्श मुलं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
कन्या विद्या मंदिर साजणी ता.हातकणंगले या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.हेरवाड ता.शिरोळ जि. कोल्हापूर येथील रहिवाशी असणाऱ्या डॉ.रोहित परीट यांचे हे दुसरे पुस्तक आहे.यापूर्वी ‘अंतिम सत्य ‘ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

error: Content is protected !!