जयसिंगपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी

Spread the love

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार यड्रावकर यांना दिला पाठिंबा

जयसिंगपूर / प्रतिनिधी

जयसिंगपूर शहरांमध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतला होता, त्यासाठीची जागा, लागणारा निधी आणि पुतळा उभारणीच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व कामांची पूर्तता झाली होती, पण या क्रांती चौकातील जागे बाबत झालेला विरोध आणि जनभावना ध्यानात घेऊन त्या ठिकाणी पुतळा उभारण्याचा निर्णय आमदार यड्रावकर यांनी स्थगीत केला होता,रविवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे पदाधिकारी, आंबेडकरवादी चळवळीत काम करणारे पदाधिकारी आणि समाजातील मान्यवर यांच्या उपस्थितीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन सध्या मंजूर जागेवर पुतळा उभारला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांनी सुचवल्याप्रमाणे जयसिंगपूर एस.टी. स्टँड समोरील जयसिंग महाराज उद्यानामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे बैठकीत एकमताने ठरले. त्याचबरोबर सर्वे नं 1251 या न्यायलयाच्या ताब्यात असलेल्या जागेबाबत पाठपुरावा करुन हि जागा देखील ताब्यात घेऊन या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युपीएससी सेंटर व अभ्यासिका उभारण्याचे ठरले पदाधिकाऱ्यांच्या या मागणीला आमदार यड्रावकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पुतळा उभारण्याचा हा विषय कायमस्वरूपी निकाली काढला जनभावनेचा आदर करणारा मी लोकप्रतिनिधी असून या पुढच्या काळात आपल्या मागणीप्रमाणे आणि भूमिकेप्रमाणे निर्णय घेतले जातील, याची ग्वाही त्यांनी बैठीकीत दिली. यावेळी पुतळा समितीचे प्रमुख पदाधिकारी श्रीपती शिंदे सर म्हणाले, आमच्या सर्व चूका पोटात घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमापोटी आमदार यड्रावकरांनी घेतलेला निर्णय आम्हा सर्वांसाठी कौतुकास्पद आहे, त्यामुळे तालुक्यातील तमाम आंबेडकरवादी जनतेने आणि सर्व समाज बांधवानी या पुढच्या काळात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सोबत राहुन त्यांना सहकार्य करूया, अणि त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करुया, असे सांगितले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात सर्व समाज बांधवांसाठी जवळपास २ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून तालुका वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे आमदार यड्रावकर यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले, यानंतर बोलताना माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रकरणात काही घटकांनी संभ्रमावस्था निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आजच्या या निर्णयाने या सर्व गैरसमजाना तिलांजली मिळाली आहे, असे सांगितले.
यावेळी रजनीकांत कांबळे, शिवाजी पोवळे, संजय शिंदे, प्रकाश सानप, अनिल सावंत, बापू कुरणे, सुनील कांबळे, विकी गायकवाड, अमोल कांबळे, अक्षय सावंत, अनिल कुरणे, बी. आर. कांबळे, सुशांत भोसले, दत्ता कांबळे, जॉन सकटे, एलिया आवळे, महेश कांबळे, विकी सकटे, पंडित सूर्यवंशी, रोहित सूर्यवंशी, विशाल सावंत, किशोर सावंत, प्रवीण कांबळे, स्वप्निल कांबळे, निखिल कांबळे, श्रेयस सावंत, सचिन कुरणे, रितेश कांबळे, अमित सावंत, शामराव देसाई, राहुल कांबळे, ओंकार कांबळे, सिथाल कांबळे, नोहा कांबळे, जाफरील घाटगे, विजय शिरोळकर, मार्शल आवळे, गणेश साठे, गणेश कोथळीकर, विकी ढाले, सुरज पोवळे, सोजल पोवळे, सुनील कांबळे यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे सर्व पदाधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!