पु शिरोली / प्रतिनिधी
पुलाची शिरोली येथे येथील मनुग्राफ कंपनीच्या समोर शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अज्ञात चोरट्याने मोटरसायकल वरून जाणाऱ्या महिलेच्या गळातील 4 लाख 50 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना आहे.पुलाची शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसातून मिळालेली माहिती अशी की हेरले येथील सौ मयुरी प्रकाश पाटील वय वर्ष 37 खाजगी नोकरी रा.माळभाग हेरले या मोटरसायकल वरुन कोल्हापूर – पुणे दिशेने जात असताना एका अज्ञात मोटरसायकल स्वाराने मयुरी पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण,झुबर,लक्ष्मी हार,पेंडल, असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल हिसकावून लंपास केला आहे.याबाबत पुलाची शिरोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पुलाची शिरोली करत आहेत.