“स्वाभिमानीला गळती” शेट्टींची साथ सोडत “या” मा उपसभापतींचा यड्रावकरांच्या पक्षात प्रवेश

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लागलेली गळती थांबण्यास तयार नाही,शिरोळचे पंचायत समितीचे माजी उपसभापती अमरसिंह माने यांनी स्वाभिमानीची साथ सोडत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश करत विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानाला पोखरण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान शिरढोणचे स्वाभिमानीचे विश्वास बालिघाटे,जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी स्वाभिमानीला सोडून गेल्यानंतर आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शहरातच शेट्टी यांना तिसरा धक्का बसला आहे.शिरोळचे माजी उपसभापती अमरसिंह माने यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पक्षात प्रवेश केला आहे.अमरसिंह माने यांच्या पत्नी अनिता अमरसिंह माने या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षातून २०१२ साली शिरोळ पंचायत समितीची निवडणूक लढली होती.त्यानंतर सौ माने यांनी स्वाभिमानीतून उपसभापती पद भूषवले होते.आज अमरसिंह माने यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नेतृत्व स्वीकारत राजर्षी शाहू आघाडीत प्रवेश केला आहे.त्यामुळे स्वाभिमानीच्या नाराज कार्यकर्त्यांना रोखणे राजू शेट्टी यांना मोठे आव्हान ठरत आहे.

error: Content is protected !!