आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शर्यत प्रेमींचा पाठींबा

Spread the love
आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शर्यत प्रेमींचा पाठींबा
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील शर्यत प्रेमी व भोंगा ग्रुपने युवा उद्योजक प्रमोद खोत यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठींबा दिला आहे.राजकीय व सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या प्रमोद खोत यांनी तालुक्यातील अनेक शर्यती प्रेमींना एकत्र येऊन या निर्णयाची घोषणा केली.त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शर्यत प्रेमींनी यावेळी एकत्र येऊन आमदार यड्रावकर यांना मोठा मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.यावेळी प्रमोद खोत, सुरज कलावंत, विशाल देशमाने,उबेद शिकलगार, महावीर मगदूम, रावसाहेब पुजारी, राज शेख, इरफान शेख, रणजीत शिंदे, विकास खोत, अवि व्हणवाडे, अनिकेत साळुंखे, अमीर मुजावर, लालु कांबळे, राजु मोरडे, उमेश गेंड, अनुप कांबळे, अतिश कांबळे, किशोर खोत, सुशांत खोत, अंकुश पुजारी, रोहित बेडक्याळे, रवी, अमर खोत, लहू पुजारी, संजय कांबळे, गणेश कांबळे, नागेश कांबळे व सौरभ बिरंणगे हे उपस्थित होते.
error: Content is protected !!