शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर चारचाकी इरटिका
गाडीची सायकलस्वाराला धडक दिल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना आज शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता घडली आहे.बाबासाहेब लक्ष्मण आवळे वय वर्ष 60 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघाताची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत घटनास्थळ व शिरोळ पोलिसातून मिळालेल्या माहिती अशी की खेड येथील प्रविण शिवनाथ दारुनकर हे इरटिका गाडी नंबर MH. 14. LJ. 3773 चार चाकी गाडी घेऊन आज शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता शिरोळ कडून नृसिंहवाडीला जात होते.भरदाव वेगाने जाणाऱ्या प्रविण दारुनकर यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी गाडी विरुद्ध दिशेला असणाऱ्या MSCB च्या विद्युत पोलला धडकून नृसिंहवाडीहुन शिरोळकडे व्यायामासाठी येणाऱ्या बाबासो आवळे यांच्या सायकलला समोरून धडक दिली.अपघातात आवळे हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.याबाबतची फिर्याद शंकर युवराज सदाकळे रा.लिंबु चौक गोठणपुर कुरूंदवाड यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे.शंकर सदाकळे यांच्या फिर्यादीनुसार सायकल व MACB च्या लोखंडी पोलचे असे एकुण 46 हजार रुपयाचे नुकसान व आवळे यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी चालक प्रविण शिवनाथ दारुनकर याच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोसई माने करत आहेत.